नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी (National Herald Case) संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना तीन दिवसांची मुदत दिली आहे. आता सोमवारी ईडी राहुल गांधींची चौकशी करणार आहे. यापूर्वी, ईडीने शुक्रवारी चौथ्यांदा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, राहुल गांधी यांना सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या प्रकृतीचे कारण देत तीन दिवस मुदतवाढ मागितली होती, ती ईडीने मान्य केली. यापूर्वी सोमवार ते बुधवार सलग तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली होती. एजन्सीने त्यांना गुरुवारीही येण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी एक दिवसाचा ब्रेक घेतला. याआधीही त्यांनी सोनिय गांधी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यासोबत वेळ घालवल्याच्या कारणावरून एक दिवसाची सुट्टी घेतली होती.
सोनिया गांधी गंगाराम रुग्णालयात दाखल आहेत, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी आणि राहुल गांधीही सोनिया गांधी यांच्यासोबत आहेत. राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणाने राजकीय खळबळही उडाली आहे. तीनही दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर आणि काँग्रेस कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आणि राहुल गांधींच्या प्रश्नांना विरोध केला. मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने कारवाई करत असून त्यामुळेच गांधी कुटुंबावर हल्ला होत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. (हे देखील वाचा: National Herald Case: राहुल गांधी ईडीकडून कार्यालयात चौकशी, आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळले टायर)
ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तीन दिवसांच्या चौकशीदरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यांची विधाने A4 आकाराच्या कागदावर टाईप केली जात आहेत आणि मिनिट-मिनिटाच्या आधारावर दाखवली जातात आणि त्यावर स्वाक्षरी केली जाते आणि नंतर चौकशी अधिकाऱ्याकडे सोपवली जाते.