प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

देशात होण्याऱ्या निर्यातीत सातत्याने चौथ्या महिन्यात घट झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात निर्यातीत 0.34 टक्क्यांनी घट झाली असून ती जवळजवळ 26 अरब डॉलर राहिली आहे. दुसऱ्या बाजूस गेल्या सहा महिन्यात आयातीतचे प्रमाण सुद्धा घटल्याने दिसून आले आहे. नोव्हेंबर महिन्यात आयातीत 11 टक्क्यांनी घट झाली असून ती 38 अरब डॉलर राहिली आहे. आयात आणि निर्यातीत झालेली ही घट अद्याप इंडस्ट्रीमध्ये आर्थिक मंदीचे सावट अद्याप असल्याचे दर्शवत आहे.

आर्थिक निर्मात्यांसाठी देशीतील मंदी ही एक गंभीर समस्या बनली आहे. वस्तूंची मागणी कमी झाल्याने औद्योगिक क्षेत्रावर त्याचा परिणाम होत आहे. परिणामी उत्पादनात सुद्धा घट होत चालली आहे. त्याचसोबत कच्च्या मालाची आयात ही कमी झाली आहे. निर्यातीत घट झाल्याने जो व्यापारापर होणारा परिणाम हा उद्योजगांसाठी समस्या ठरु शकते. सरकार कडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पेट्रोलियम उत्पादन, दागिने, चामडे यांच्या उत्पादनाच्या निर्यातीत घट झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 26.07 अरब डॉलरची निर्यात झाली होती. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत आयातीमध्ये 12.71 टक्क्यांवरुन 38.11 अरब डॉलर झाली आहे. गेल्या वर्षात आयात 43.66 अरब होती.(किरकोळ बाजाराला महागाईचा फटका तर औद्योगिक उत्पादनाला दिलासा)

 आयातीमध्ये झालेली घट पाहता त्यावरुन असे सांगण्यात येत आहे की, कच्च्या तेलाची आयात 18 टक्क्यांनी कमी झाली असून 11 अरब डॉलर राहिला आहे. पेट्रोलिय पदार्थांची आयात 10 टक्क्यांनी कमी होऊन 27 अरब डॉलर राहिली आहे. त्याचसोबत वाहतुकीच्या सामानात सुद्धा 50 टक्क्यांनी आर्थिक मंदीमुळे कपात झाली आहे. तर जागतिक कारण आणि मंदीमुळे याचा थेट परिणाम निर्यातीवर सुद्धा दिसून आला आहे.