Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Earthquake in Gujarat: गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात (Kachchh District) भूकंपाच्या (Earthquake) धक्क्यांमुळे घबराट पसरली आहे. सोमवारी सकाळी जिल्ह्यात 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मिक रिसर्चने (ISR) यांसदर्भात माहिती दिली. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे किंवा इतर कशाचेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. गांधीनगर-आधारित ISR ने सांगितले की, भूकंप सकाळी 10.44 वाजता झाला आणि त्याचा केंद्रबिंदू लखपतच्या उत्तर-ईशान्य 76 किमी अंतरावर होता. या महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात दोनदा तीनपेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

गुजरात भूकंपाचा उच्च धोका असलेला प्रदेश -

ISR नुसार, 7 डिसेंबर रोजी जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची तीव्रता 3.2 नोंदवण्यात आली होती. गेल्या महिन्यात 18 नोव्हेंबर रोजी कच्छमध्ये चार तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला होता. ISR डेटानुसार, यापूर्वी 15 नोव्हेंबर रोजी उत्तर गुजरातमधील पाटणमध्ये 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता. गुजरात हा भूकंपाचा उच्च धोका असलेला प्रदेश आहे. (हेही वाचा -Earthquake in Gujarat: गुजरातमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; अहमदाबाद, गांधीनगरसह जवळपासची शहरे हादरली)

कच्छमध्ये 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप - 

2001 च्या भूकंपात 13,800 लोकांचा मृत्यू -

गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (GSDMA) च्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये गेल्या 200 वर्षांत नऊ मोठे भूकंप आले आहेत. GSDMA च्या मते, 26 जानेवारी 2001 रोजी झालेला कच्छचा भूकंप गेल्या दोन शतकांमध्ये भारतात झालेला तिसरा सर्वात मोठा आणि दुसरा सर्वात विनाशकारी भूकंप होता. भूकंपात जिल्ह्यातील अनेक शहरे आणि गावे जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती, ज्यामुळे सुमारे 13,800 लोकांचा मृत्यू झाला आणि 1.67 लाख लोक जखमी झाले.