Badrinath National Highway Blocked: चमोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे (Heavy rain in Chamoli)बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग(Badrinath National Highway Blocked)ठप्प झाला आहे. रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशांतील इतर भागांतही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या आठवडाभरात रूद्रप्रयागमध्ये भूस्खलन होऊन चार नेपाळी श्रमिकांचा मृत्यू झाला होता. तर हरिद्वारमध्ये एक जण गंगा नदीत वाहून गेला होता. (हेही वाचा:Uttarakhand: चारधाम यात्रेत यावर्षी 183 भाविकांचा मृत्यू; उत्तराखंड सरकारकडून आकडेवारी जाहीर )
मुसळधार पावसाने अनेक नद्या दुधडी भरून वाहत आहेत. पाथरी राऊ नदीचे पाणी घरांमध्ये घुसल्याने तेथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले होते. पुरामुळे नदीपात्राच्या परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तेहरी जिल्ह्यातील बाणगंगा भागात मुसळधार पावसामुळे काही घरांची पडझड झाली. राज्यात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे केदारनाथ, ब्रदीनाथ आणि यमुनोत्री जोडणारे राष्ट्रीय महामार्ग ठप्प होत आहेत. (हेही वाचा:Uttarakhand मध्ये सुरू असलेल्या पावसामुळे Alaknanda River च्या पाणी पातळीत प्रचंड वाढ (Watch Video))
दरड कोसळल्याची घटना
Uttarakhand: Heavy rain in Chamoli district has blocked the Badrinath National Highway at Pagal Nala. The disruption started last night and continues due to persistent rainfall pic.twitter.com/9wDQMszN5t
— IANS (@ians_india) September 2, 2024
मुसळधार पावसामुळे यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग बनसजवळ उखडला गेला आहे. त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पावसामुळे देहराडूनच्या कोचरी कॉलनीसह अनेक भाग जलमय झाले होते. दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यामध्येही पावसाचा हाहरकार पहायला मिळत आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मुसळधार पावसामुळे कमीत कमी 19 लोक मृत पावले आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या विविध भागातून 17,000 हून अधिक लोकांना हलवण्यात आले आहे.
कारण सततच्या पावसामुळे राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होत आहे. सुमारे 140 गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे रस्ते बंद झाले आहेत, अनेक भागांचा संपर्क तुटला आहे आणि हजारो लोक अडकून पडले आहेत. दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. यामुळे नद्यांना उधाण आले आहे. हैदराबाद आणि विजयवाडा सारख्या शहरांसह बराच मोठा भाग पाण्याखाली आहे.