मुक्या प्राण्यांची हत्या किंवा त्यांच्याशी क्रुरतेने वागणे कायद्याने गुन्हा असतानाही बिहारमधील (Bihar) औरंगाबाद (Aurangabad) येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरातील कुडवा गावात एका दारुड्याने दारुच्या नशेत एका शेळीची हत्या (Drunk Man Kills Goat) केली आहे. याप्रकरणी गोह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी गोह पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
शकुंतला देवी आणि तिचा पती सुदामा साव यांनी त्यांच्या शेळीच्या हत्येबाबत पोलिसांत दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, त्यांच्या घरासमोर असलेल्या विजेच्या खांबाला त्यांनी शेळीला बांधले होते. मात्र, त्यावेळी रस्त्यातून जाताना मद्यधुंद अवस्थेत असेलल्या आरोपी महेंद्र दासने त्यांच्या शेळीला पकडले. ज्यामुळे शेळी जोरात ओरडू लागली. त्याचवेळी महेंद्रने शेळीची मान मोडून तिची हत्या केली. दरम्यान, शंकुतला आणि तिच्या नवऱ्याला त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांना शिवीगाळ करीत त्यांच्याशी भांडू लागला. हे देखील वाचा- Lightning Strikes in Bihar: वीज कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू, बिहारच्या बांका येथील घटना
औरंगाबादचे जिल्हा दंडाधिकारी कांतेश मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की महेंद्र दासवर आयपीसी कलम आणि प्राणी प्रतिबंध क्रूरता कायदा, 1960 अंतर्गत अटक करण्यात आली पोलिसांनी त्याच्यावर राज्यात दारूबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. अटकेनंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. गोह पोलीस स्टेशनचे एसएचओ, मोहम्मद शमीम अहमद यांच्या मते, दास यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील माओवादी कारवायांमध्ये सामील होता.