देशात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर वीज कोसळल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. झारंखड येथे काही तासांपूर्वी वीज कोसळल्याने जवळपास 20 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना घडून काही तास उलटले नाही, तोच बिहारच्या (Bihar) बांका (Banka) जिल्ह्यात वीज कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेवर आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या आपत्तीच्या वेळी बिहार सरकार पीडित कुटुंबासोबत आहे. दरम्यान, मृतांच्या आत्मेस शांती आणि जखमींना लवकरात लवकर बरे करण्याची त्यांनी देवाकडे प्राथना केली आहे. मृतांमध्ये अमरपूर, चंदन आणि कटोरिया येथील प्रत्येकी दोन आणि बाउन्सी येथील एकाचा समावेश आहे. हे देखील वाचा- कर्नाटक मध्ये आढळला Eta Variant चा रुग्ण; कसं आहे कोविड-19 चे नवे स्वरुप? जाणून घ्या
ट्वीट-
बांका जिला में आकाशीय बिजली से 7 लोगों की मृत्यु का समाचार अत्यंत ही दुःखदायी है।
आपदा की इस घड़ी में बिहार सरकार पीड़ित परिवार के साथ है। इस घटना में मृत एवं घायलों के साथ मेरी गहरी संवेदना है
ईश्वर से मृतकों को शांति प्रदान करने एवं घायलों को जल्द स्वस्थ करने की कामना करता हूं।
— Mangal Pandey (@mangalpandeybjp) August 7, 2021
दरम्यान, शनिवारी देशातील विविध राज्यांमध्ये विजेच्या घटनेत किमान अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. तर, कित्येक लोक जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालच्या दोन जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने चार जण ठार झाले होते. तर, ओडिशाच्या तीन जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.