Greater Noida Murder Case: ऑर्डर देण्यास विलंब केल्याने डिलिव्हरी बॉयने केली हॉटेल मालकाची हत्या, आरोपींचा शोध सुरू
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

देशात गुन्हेगारी (Crime) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नुकतीच एक ग्रेटर नोएडामधील (Greater Noida) शुल्लक कारणांवरून हॉटेल मालकाची (Hotel owner) हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. ऑर्डरमध्ये (Order) विलंब झाल्याच्या वादानंतर स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने (Swiggy's Delivery Boy) एका रेस्टॉरंटच्या मालकाची कथितपणे हत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी 12:15 च्या सुमारास ग्रेटर नोएडामध्ये घडली आहे. मृताचे नाव आहे सुनील असे आहे. जो ग्रेटर नोएडाच्या मित्र सोसायटीमध्ये झम झम फूड डिलिव्हरी रेस्टॉरंट चालवत होता.  आरोपी डिलीव्हरी बॉय (Delivery Boy) फरार आहे. मात्र आरोपींची ओळख पटली होती की नाही हे अस्पष्ट राहिले आहे.

अहवालांनुसार पोलिसांनी सांगितले की, स्विगीचा एक डिलीव्हरी बॉय चिकन बिर्याणी आणि पुरी सब्जीची ऑर्डर गोळा करण्यासाठी झम झॅम रेस्टॉरंटमध्ये आला.  रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या नारायणने चिकन बिर्याणी डिलिव्हरी बॉयला दिली. यानंतर त्याला सांगितले की दुसऱ्या ऑर्डरला थोडा वेळ लागेल. यामुळे डिलिव्हरी बॉय संतप्त झाला आणि त्यांच्यात वाद झाला. हेही वाचा Haryana Shocking: हरियाणात खळबळ! आई-वडील, बहिण आणि आजीची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरूणाला अटक

शाब्दिक चकमक पाहून सुनील आला. त्याने डिलिव्हरी बॉय आणि नारायण दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र डिलिव्हरी बॉयने ऐकले नाही. त्याने सुनीलच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागल्याने सुनील जमिनीवर कोसळला. ते पाहून डिलिव्हरी बॉय घटनास्थळावरून पळून गेला. नारायण आणि इतर कामगारांनी सुनीलला रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे पोहोचण्याआधीच तो मरण पावला होता. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले की डिलीव्हरी बॉय मद्यधुंद अवस्थेत होता.  डिलिव्हरी बॉयसोबत आणखी एक माणूस आहे. ज्याने सुनीलला मारण्यास मदत केली. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले. गुन्हेगारांना लवकरच पकडले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

एडीसीपी, ग्रेटर नोएडा झोन विशाल पांडे यांनी सांगितले की, ऑर्डर डिलिव्हरीमध्ये विलंब झाल्यामुळे डिलिव्हरी बॉयने रेस्टॉरंट मालकावर गोळी झाडली. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळाजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला जात आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल.