Delhi Government New Guidelines: लग्न सोहळ्यात आता फक्त 50 जणांनाच उपस्थित राहता येणार; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्ली सरकारची नवी नियमावली जारी
Delhi CM Arvind Kejriwal (Photo Credits: ANI)

दिल्लीमध्ये (Delhi) कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, राज्यात यापुढे लग्न सोहळ्यासह इतर सर्व कार्यक्रमात केवळ 50 जणांना उपस्थित राहता येणार आहे. तसेच कोरोनाचे हॉटस्पॉट ठरणारे बाजार बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरंविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. दिल्लीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ चिंताजनक आहे.

मुख्यमंत्री अरंविद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत गेल्या काही आठवड्यापूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येत सुधारणा झाली होती. परंतु, लग्न सोहळ्यात 50 ऐवजी 200 जणांना लग्न सोहळ्यात उपस्थित राहण्याची केंद्र सरकारने परवानगी दिली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयात बदल करण्यात आला असून आता यापुढे लग्न सोहळ्यात केवळ 50 जणांना उपस्थित राहताय येणार आहे. याबाबत आम्ही उपराज्यपाल यांना पत्रद्वारे विनंती केली आहे. याबाबत लवकरच त्यांची मंजूरी मिळेल, अशी आशा करतो. तसेच दिल्लीतील काही बाजारात अनेकजण मास्क न लावता आणि सोशल डिस्टेंसिंगच्या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे निर्दशनास आले आहे. ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने अनेक बाजर हॉटस्पॉट ठरू लागली आहेत. केंद्र सरकारने अशा बाजारांना बंद करण्याची राज्य सरकारला परवानगी द्यावी. या संबंधित केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. हे देखील वाचा- रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! लखनऊ-दिल्ली आणि मुंबई-अहमदाबाद 'तेजस एक्सप्रेस' येत्या 23 नोव्हेंबरपासून होणार रद्द, 'हे' आहे त्यामागचे कारण

कठीण परिस्थितीत केंद्र सरकारने आम्हाला सहयोग केला, याबाबत मी त्यांचे आभार मानतो. दिल्लीत 750 आईसीयू बेड वाढवण्यात येईल, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. केंद्र सरकारच्या या मदतीचा राज्य सरकारला मोठा फायदा होता. काही रुग्णालयात आयसीयू बेड्सची कमतरता आहे. सरकारी रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध आहेत, परंतु, काही खाजगी रुग्णालयात आयसीयू बेड्सची कमतरतात जाणवू लागली आहे. यांसारख्या रुग्णालयात सामन्य बेड आहेत. मात्र, आयसीयू बेड कमी होत आहेत. दरम्यान,सर्व सरकार आणि एजेन्सिज एकत्र काम करत आहेत. प्रत्येकजण कोरोनावर मात करण्यासाठी लढत आहे. परंतु, जोपर्यंत योग्य खबरदारी घेत नाहीत, तोपर्यंत आपण या लढ्यात यशस्वी होऊ शकत नाही, असेही मुख्यमंत्री अरंविद केजरीवाल म्हणाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी राज्यातील सर्व नागरिकांना मास्क घालणे आणि सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.