रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! लखनऊ-दिल्ली आणि मुंबई-अहमदाबाद 'तेजस एक्सप्रेस' येत्या 23 नोव्हेंबरपासून होणार रद्द, 'हे' आहे त्यामागचे कारण
Tejas Express (Photo Credits: Instagram)

IRCTC ने कोरोना व्हायरसचा (Coronavirus) धोका लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेऊन हळूहळू रेल्वे पूर्वपदावर आणत आहेत. त्यात त्यांनी 17 ऑक्टोबरपासून लखनऊ-दिल्ली (Lucknow-Delhi) आणि मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) तेजस एक्सप्रेस (Tejas e=Express) या दोन रेल्वे सुरु केल्या होत्या. मात्र प्रवाशांचा योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने येत्या 23 नोव्हेंबरपासून हा रेल्वे सेवा रद्द करण्याचा निर्णय IRCTC ने घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची ही धक्कादायक बातमी असून या मार्गे प्रवास करणा-यांवर थोड्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन यामुळे लखनऊ-दिल्ली आणि मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस गेले 7 महिने बंद होती. अशातच 17 ऑक्टोबरपासून ही रेल्वे पुन्हा सुरु करण्यात आली होती. मात्र कोरोना व्हायरसचा भारतावरील धोका पुर्णपणे टळला नसल्याने लोकांची म्हणावी तशी संख्या तेजस एक्सप्रेसमध्ये दिसली नाही. त्यामुळे या रेल्वे सुरु ठेवल्याने योग्य तसा फायदा रेल्वेला होत नसल्याने IRCTC ने या रेल्वे रद्द केल्या आहेत. हेदेखील वाचा- मुंबई: बोरीवली, मालाड सांताक्रूज रेल्वे स्टेशन्स चे पालटले रुप, स्थानकांवर रेखाटण्यात आली सुंदर चित्रे, See Pics

लखनऊ-नवी दिल्ली (82501/82502) तेजस एक्सप्रेस 23 नोव्हेंबरपासून रद्द केली जाईल. तर अहमदाबाद-मुंबई (82901/82902) तेजस एक्सप्रेस 24 नोव्हेंबरपासून रद्द केली जाईल. या रेल्वे इतर रेल्वेमधील प्रवाशांची संख्या पाहता नंतर सुरु करण्यात येतील असे IRCTC कडून सांगण्यात येत आहे. दरम्यान या रेल्वेने प्रवास करु इच्छिणा-या या गोष्टीची माहिती घेऊन त्यानुसार आपला प्रवास योजावा असेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान कोरोना व्हायरसची खबरदारी घेऊन त्यानुसार येथील रेल्वे सेवा हळूहळू सुरु केली जाईल. यात सोशल डिस्टंसिंगसाठी एक सीट सोडून दुसरी सीट रिक्त ठेवणे, मास्क लावणे यांसारख्या नियमांचे पालन केले जात आहे की नही ते पाहिले जाईल. त्याचबरोबर सर्व प्रवाशांचे पहिले थर्मल स्क्रिनिंग होईल. त्यानंतर एकदा बसल्यावर पुन्हा सीट बदलता येणार नाही. त्याचबरोबर सर्व प्रवाशांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे गरजेचे आहे.