
Delhi Crime: दिल्लीत (Delhi) एक अॅसिड (Acid) हल्ला झाल्या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. दिल्लीत 22 वर्षीय सुनेवर सासूने अॅसिड फेकलं आहे. या घटनेमुळे शहारात मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी एका अधिकाऱ्याने या प्रकरणाची माहिती दिली आहे. ही घटना दिल्लीतील ईशान्य भागातील न्यू उस्मानपूर परिसरात घडली आहे. बुधवारी ही घटना सांयकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडीत तरुणी 25 टक्के अॅसिडने भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
अॅसिड फेकल्यानंतर आरोपी अंजली आणि इतर कुटुंब सदस्य फरार झाले. शुक्रवारी अंजलीला संत नगर बुरारी येथून अटक करण्यात आली आहे. पीडितेला जेपीसी रुग्णालयातून एलएनजेपी रुग्णालयात पाठवण्यात आले होते, जिथे तिच्यावर सद्या उपचार सुरु आहे. मिळालेल्या माहिती नुसार, पीडितेचे लग्न दोन वर्षांपुर्वी झाले होते. तीला सहा महिन्यांची एक मुलगी आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजलीने पीडितेवर रागाच्या भरात अॅसिड फेकले. अॅसिड फेकल्यानंतर घरातील सदस्य फरार झाले. स्थानिकांच्या मदतीने पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीचा २५ टक्के भाग जळल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गुरुवारी, दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी राष्ट्रीय राजधानीत एका महिलेवर तिच्या सासूने अॅसिड हल्ला केल्याबद्दल दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे.