Shraddha Murder Case: दिल्ली पोलिसांसमोर नवे आव्हान; 26 नोव्हेंबरपर्यंत कराव्या लागणार आफताबच्या सर्व चाचण्या
Shraddha Murder Case (Photo Credit-Twitter/ ANI)

Shraddha Murder Case: राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील छतरपूर भागातील श्रद्धा वालकर हत्याकांडातील (Shraddha Walkar Murder Case) आरोपी आफताब अमीन पूनावालाच्या पॉलीग्राफ चाचणीचे (Aaftab Polygraph Test) दुसरे सत्र आज सुरू आहे. रोहिणी येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत सुमारे चार तास आफताबची पॉलीग्राफ चाचणी सुरू होती. यानंतर पोलीस प्रयोगशाळेतून आफताबला घेऊन दक्षिण दिल्लीला रवाना होतील. श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसांना ठोस पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे आरोपी आफताबची पॉलीग्राफिक चाचणी करण्यात आली आहे. आता यानंतर त्याची नार्को टेस्टही होणार, अशी अटकळ बांधली जात आहे. आफताब 26 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत असताना, आफताबचा रिमांड संपण्यापूर्वी त्याच्या सर्व चाचण्या पूर्ण करण्याचे नवे आव्हान दिल्ली पोलिसांसमोर आहे.

या खून प्रकरणात आफताबला दोषी ठरवण्यासाठी पोलिस वैज्ञानिक पुराव्यावर अधिक अवलंबून आहेत. कारण पोलिसांना अद्याप श्रद्धाचे शीर सापडलेले नाही. याशिवाय त्याच्या मृतदेहाचे तुकडेही अद्याप मिळालेले नाहीत. अशा स्थितीत आफताबच्या सर्व चाचण्या अवघ्या दोन दिवसांत पूर्ण कराव्या लागणार आहेत. (हेही वाचा -Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडात दिल्ली पोलिसांना मिळाला महत्त्वाचा सुगावा; बॅग घेऊन फिरणारा आफताब CCTV मध्ये कैद, Watch Video)

पोलिसांना कोणत्याही गुन्हेगाराचा 14 दिवसांपेक्षा जास्त काळ न्यायालयातून रिमांड मिळत नाही. अशा परिस्थितीत शनिवार 26 नोव्हेंबर रोजी आफताबचे 14 दिवस पूर्ण होणार आहेत. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. याप्रकरणी अनेक पथकांनी जवळपास पाच राज्यांना भेटी दिल्या आहेत. (हेही वाचा - Shraddha Murder Case: पाण्याच्या बिलामुळे श्रद्धा खून प्रकरणात आला नवा ट्विस्ट; शेजारी म्हणाला, आफताब रोज टाकी तपासायचा)

श्रद्धाच्या हत्येतील आरोपी आफताबची दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात पॉलिग्राफ चाचणी सुरू आहे. पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना पोलिसांचे पथक त्याची चौकशी करत आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला विचारण्यासाठी सुमारे 50 प्रश्न तयार केले आहेत. पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, श्रद्धाचे डोके मिळण्याची शक्यता जवळपास संपली आहे. सापडलेल्या जबड्याच्या भागात फक्त दात सापडले आहेत. श्रद्धाचे डोके जंगली प्राण्यांनी खाल्ले असावे आणि ते कधीच परत मिळू शकत नाही, असा पोलिस अधिकाऱ्यांचा संशय आहे.