Shraddha Murder Case: पाण्याच्या बिलामुळे श्रद्धा खून प्रकरणात आला नवा ट्विस्ट; शेजारी म्हणाला, आफताब रोज टाकी तपासायचा
Shraddha Murder Case (Photo Credit- ANI)

Shraddha Murder Case: मुंबईतील श्रद्धा वॉकर (Shraddha Walkar)च्या निर्घृण हत्या प्रकरणातील दिल्ली पोलिसांच्या तपासात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. दरम्यान, श्रद्धाची हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावाला (Aftab Poonawala) याच्या दिल्लीतील छतरपूर फ्लॅटचे पाण्याच्या बिलावरून मोठा पुरावा समोर आला आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब-श्रद्धा यांच्याकडे 300 रुपये पाणी बिल थकबाकी आहे. हत्येनंतर आफताबने रक्ताचे डाग साफ करण्यासाठी भरपूर पाणी वापरले, त्यामुळे पाण्याचे बिल आणि बिल थकले असल्याचे बोलले जात आहे. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, आफताब नियमितपणे इमारतीच्या पाण्याची टाकी तपासण्यासाठी जात असे.

वास्तविक, तीन मजली घराचे पाण्याचे बिल मे 2022 मध्ये जास्त आले. अशा स्थितीत श्रद्धाच्या हत्येनंतर रक्ताचे डाग धुण्यासाठी आफताबने जास्त पाणी वापरले असावे, त्यामुळे पाण्याचे बिल जास्त आले, अशा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी आफताबने मे महिन्याचे पाणी बिलही जमा केले नसल्याचेही समोर आले आहे. (हेही वाचा - Boundary Walls: गुरांची धडक टाळण्यासाठी रेल्वेने घेतला मोठा निर्णय; बांधणार 1,000 किमी नेटवर्कवर सीमा भिंत)

तीन मजली घराच्या पहिल्या मजल्यावर आफताब गर्लफ्रेंड श्रद्धासोबत राहत होता आणि तिन्ही फ्लॅटचे बिल एकत्र येत होते. मे महिन्यात पहिल्यांदाच पाण्याचा वापर जास्त झाला होता, तर त्याआधी आणि नंतरच्या महिन्यांत पाण्याचा तितका वापर झाला नाही. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी भांडणाच्या वेळी आफताबने गर्लफ्रेंड श्रद्धाची हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह बाथरूममध्ये नेला. यानंतर बाथरूममध्येच श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करण्यात आले. दरम्यान, श्रद्धाच्या शरीराचे तुकडे झाल्यानंतर रक्ताचे डाग धुण्यासाठी आफताबने तुलनेने अधिक पाण्याचा वापर केला असावा, या दृष्टिकोनातून दिल्ली पोलीस तपास करत आहेत.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसी श्रद्धा वॉकरची हत्या केल्यानंतर आफताबने रक्ताचे डाग साफ करण्यासाठी पाण्याचा नळ चालू ठेवला होता आणि तिचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला होता. साहजिकच जास्त पाणी वापरल्यामुळे घरातील पाण्याचे बिल जास्त आले. दिल्ली पोलिसांचा अंदाज बरोबर निघाला, तर श्रद्धा हत्याकांडातील पाण्याचे बिल हा मोठा आणि महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.

विशेष म्हणजे मुंबईहून दिल्लीत आलेल्या आफताब आणि श्रद्धाने दिल्लीतील छतरपूर भागात भाड्याचे घर घेतले होते. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दोघेही या घरात शिफ्ट झाले होते आणि 18 मे रोजी आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले जात आहे. आफताबने पहिल्या मजल्यावरचा फ्लॅट भाड्याने घेतला होता.

आरोपीने मे महिन्याचे पाणी बिल भरले नाही -

दुसरीकडे, या फ्लॅटचे केअरटेकर राजेंद्र कुमार यांच्या म्हणण्यानुसार, आफताब पूनावाला यांनी फ्लॅटचे पाण्याचे बिल भरलेले नाही. येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की तीन मजली इमारतीच्या सर्व भाडेकरूंनी यापूर्वी कधीही पाण्याचे बिल भरले नव्हते, कारण दिल्ली सरकार 500 लिटर पाण्याच्या वापरासाठी शुल्क आकारत नाही.