Shraddha Murder Case: आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वॉकर (Shraddha Walker) ची निर्घृण हत्या (Murder) करणारा आफताब अमीन पूनावाला (Aftab Poonawala) पोलिसांच्या चौकशीत रोज नवनवीन खुलासे करत आहे. दरम्यान, श्रद्धा खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांना आफताबचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यात तो तीनदा चक्कर मारताना दिसत आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी तो बॅग घेऊन बाहेर गेला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
दिल्ली पोलीस मेहरौलीच्या जंगलाव्यतिरिक्त गुरुग्रामपासून दिल्लीपर्यंत अनेक भागात श्रद्धाच्या शरीराचे अवयव शोधण्यासाठी शोध मोहीम राबवत आहेत. तर दुसरीकडे, सीसीटीव्ही फुटेजमध्ये बॅगसोबत दिसणारा आफताब श्रद्धाच्या शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावताना दिसत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (हेही वाचा - Jet Airways Employees Salary Cut: जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 50 टक्क्यांपर्यंत कपात; अनेक कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय पाठवले रजेवर)
पोलिसांना मिळाले 18 ऑक्टोबरचे फुटेज -
आफताबने आधी श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर चॉपरने मृतदेहाचे 35 तुकडे केले. त्यानंतर एक फ्रीज विकत घेतला. त्यात शरीराचे कापलेले भाग साठवले आणि बऱ्याच दिवसांनी ते फेकून दिले. इंडिया टुडे टीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी 18 ऑक्टोबरचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहेत. ज्यामध्ये आफताब बॅग घेऊन जाताना दिसत आहे. या व्हिडिओवरून असा संशय व्यक्त करण्यात येत आहे की, तो आपल्या मैत्रिणीच्या शरीराचे तुकडे फेकण्यासाठी जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आफताब तीन फेऱ्या मारत असल्याचे दिसून आले. ज्यावरून आरोपी श्रद्धाच्या अवयवांची विल्हेवाट लावण्यासाठी बॅग घेऊन बाहेर पडला असावा, असा संशय पोलिसांना आला आहे. दरम्यान, श्रद्धा हत्याकांडातील हरवलेल्या महत्त्वपूर्ण पुराव्याचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांची मेहरौली जंगलात शोध मोहीम सलग सहाव्या दिवशीही सुरू आहे.
#WATCH | Shraddha murder case: CCTV visuals of Aftab carrying bag at a street outside his house surface from October 18 pic.twitter.com/S2JJUippEr
— ANI (@ANI) November 19, 2022
हत्येच्या दिवशी आफताब दारूच्या नशेत -
हत्येच्या दिवशी आफताब ड्रग्जच्या नशेत होता, असा धक्कादायक खुलासा दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या खुलाशांमध्ये आरोपीने कबूल केले आहे की, श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. यावरून या दोघांमध्ये नेहमी भांडण होत असे. 18 मे रोजीही असाच प्रकार घडला, त्यानंतर आफताबने श्रद्धाची हत्या केली.