
Delhi News: रिलायन्स डिजिटलमध्ये प्रिंटर खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका सेल्समनची लॉटरी लागल्याची घटना घडली आहे. सेल्समनची लपलेली प्रतिभा पाहून दिल्लीच्या अनस्टॉपचे संस्थापक आणि सीईओ अंकित अग्रवाल यांनी त्याला नोकरीची ऑफर दिली आहे. अग्रवाल यांनी केलेल्या कृतीचे लोकांनी कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले की, "नेतृत्व म्हणजे हेच आहे - प्रतिभा ओळखणे जिथे इतर त्याकडे दुर्लक्ष करू शकतात. आणखी एका युजरने लिहिले की, 'डिग्रीपेक्षा कौशल्य महत्त्वाचे आहे, हा याचा खरा पुरावा आहे. तुम्हा दोघांचेही अभिनंदन! या घटनेची आठवण सांगताना अग्रवाल यांनी लिंक्डइनवर लिहिले की, "प्रिंटर विकत घेताना मी कुणाला तरी कामावर घेतले! संभाषणादरम्यान, त्याने मला सांगितले की, तो फ्रंट-एंड डेव्हलपर बनण्यासाठी इच्छुक आहे. तो सतत शिकत होता, सुधारत होता आणि नवीन संधी शोधत होता.
अनस्टॉपचे संस्थापक आणि सीईओ अंकित अग्रवाल यांनी शॉपिंग ट्रिपदरम्यान रिलायन्स डिजिटलमध्ये पोहोचले तेव्हा तेसेल्समनला भेटले. सीईओ अंकित अग्रवाल यांचा हेतू फक्त प्रिंटर विकत घेण्याचा होता.