दिल्ली: गाण्याच्या आवाजावरून शेजाऱ्यांनी एकाच कुटुंबातील तिघांवर केला धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; एकाचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (Photo credit - File Photo)

दिल्लीच्या (Delhi) नॉर्थ-वेस्ट भागातील भड़ौला गावात मोठ्या आवाज गाणे लावल्याने वाद झाला. या वादात एका कुटुंबातील तीन भावांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये एका भावाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मृताच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, हा वाद म्यूझिक सिस्टमच्या आवाजावरून झाला. ज्या ठिकाणी गाणे सुरू होते त्या ठिकाणी गाण्याचा आवाज कमी करण्यासाठी शेजारचे काही लोक आले. आवाज कमी करण्यासाठी आलेल्या लोकांनी जवळच्या दुकानातून धारदार शस्त्रे घेतली आणि मोठ्या आवाजात गाणे लावणाऱ्या कुटुंबियावर हल्ला केला. (हेही वाचा - धक्कादायक! हरियाणाच्या Faridabad जिल्ह्यात महाविद्यालयाबाहेर 21 वर्षीय तरुणीची गोळ्या घालून हत्या)

यावेळी कुटुंबात तीन भाऊ उपस्थित होते. या लोकांनी तिघांवर चाकूने हल्ला केला. तिघांनाही जवळील जहांगीरपुरी येथील बाबू जगजीवन राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात 30 वर्षीय सुशीलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच अनिल आणि सुरजीत हे दोने या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - धक्कादायक! बलिया मध्ये भाजप नेत्याच्या पार्टीमध्ये गोळीबार, कार्यक्रमातील भोजपुरी गायक Golu Raja झाले गंभीर जखमी, Watch Video)

मृताचा भाऊ सुरजीत याने सांगितले की, हे भांडण फक्त गाण्याच्या आवाजावरून झाले. घराबाहेरच्या गल्लीमध्ये हा वाद सुरू झाला. आरोपींनी चाकू काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत आणखी पाच जण होते. ते आमच्यावर हल्ला करून घटनास्थळावरून पळून गेले. यातील एका आरोपीचं नाव चांद असं असून इतर दोघे-तिघे त्याचे भाऊ आहेत. पोलिसांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही, असंही सुरजीतने सांगितलं.

दरम्यान, हा वाद केवळ गाण्याच्या आवाजावरून झाला की, यामागे दुसरं कारण होतं, हे तपासणीनंतरच स्पष्ट होईल. सध्या महिंद्रा पार्क पोलिस ठाण्याचे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे भड़ौला गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.