धक्कादायक! हरियाणाच्या Faridabad जिल्ह्यात महाविद्यालयाबाहेर 21 वर्षीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Video of Woman Shot Dead in Chandigarh. (Photo Credits: Twitter)

हरियाणाच्या (Haryana) फरीदाबाद जिल्ह्यातील (Faridabad District) बल्लभगड (Ballabgarh) मध्ये सोमवारी महाविद्यालयाबाहेर एका 21 वर्षीय तरुणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. ही घटना घडली तेव्हा ही तरुणी तिच्या महाविद्यालयातून परीक्षा घेऊन बाहेर आली होती, अशी माहिती बल्लभगडचे एसीपी जयवीरसिंग राठी (ACP Ballabgarh, Jaiveer Singh Rathi) यांनी दिली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली असून या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी तरुणीला आपल्या कारमध्ये बसवून पळवून नेण्याच्या प्रयत्नात होता. त्याने या तरुणीला कारमध्ये खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, यास तिने विरोध केला. त्यानंतर यातील एका आरोपीने तिला गोळी घातली. त्यानंतर तरुणी खाली कोसळली आणि आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. (हेही वाचा - धक्कादायक! बलिया मध्ये भाजप नेत्याच्या पार्टीमध्ये गोळीबार, कार्यक्रमातील भोजपुरी गायक Golu Raja झाले गंभीर जखमी, Watch Video)

या घटनेनंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यात तरुणीचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासणी दरम्यान आरोपींपैकी एकासोबत तरुणीची ओळख होती, असं समोर आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे राठी यांनी सांगितलं.

या प्रकरणातील आरोपी रेहान याला नूह येथून अटक करण्यात आली आहे. तसेच सोमवारी तौसिफला नूह येथून अटक करण्यात आली होती. दरम्यान हत्या करण्यात आलेल्या तरुणीच्या कुटुंबियांनी बल्लभगड येथे राष्ट्रीय महामार्गावर निदर्शने केली.