Delhi Dog Attack Video: दिल्ली परिसरात कुत्र्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. दरम्यान शहरातील विश्वास नगर परिसरात कुत्र्याने दोन वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. मंगळावारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात आजही खळबळ उडाली आहे. दोन वर्षाच्या चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. रागाच्या भरात कुत्राने चिमुकल्यावर हल्ला केला. आईच्या हातातून चिमुकलीला खेचल्याचे दिसत आहे.( हेही वाचा-शेजारणीच्या घरात कुत्रा भुंकल्याने महिलेला चपलेने बेदम मारहाण)
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, सकाळच्या वेळीस ही घटना आहे, लहान मुलाला घेऊन एक महिला चालत होती. दरम्यान एक पाळीव कुत्रा रागाच्या भरात जवळ येऊन लहान मुलाच्या अंगावर हल्ला केला. तिला खेचून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असताना, मुलाच्या आईने आणि स्थानिकांनी वेळीच मदत केली.त्यामुळे चिमुकला थोडक्यात वाचला. आई आणि तिच्या मुलावर वारंवार उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पाळीव कुत्रा हा जर्मन शेफर्ड जातीचा असल्याचे दिसत आहे.
पूर्वी दिल्ली के विश्वास नगर इलाके में कुत्ते ने एक दो-वर्षीय बच्चे को काट लिया घटना उस समय हुई जब एक महिला अपने कुत्ते के साथ गली में टहल रही थी, और अचानक कुत्ता उस छोटे बच्चे पर हमला कर बैठा #dog pic.twitter.com/LrA0DGdls5
— Lavely Bakshi (@lavelybakshi) January 24, 2024
दोघेही जमीनीवर खाली पडले आणि त्यानंतर एकाने कुत्र्याला दूर करण्याचे प्रयत्न केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेत चिमुकलीला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. कुत्र्याच्या हल्ल्याच्या घटना अलीकडे वाढत चालल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे.