Arvind Kejriwal (Photo Credits: PTI)

Delhi CM Arvind Kejriwal tests negative for coronavirus: कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. दरम्यान, अनेक राजकीय नेते कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचे समजत आहे. यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने केजरीवाल यांनी स्वत:ला आयसोलेट केले होते. आज सकाळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, अरविंद केजरीवाल यांचा कोरोनाचा अहवाल थोड्याच वेळापूर्वी प्राप्त झाला आहे. ज्यात त्यांना कोरोना नसल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने नुकतीच दिली आहे.

सोमवारी (8 जून) ताप आल्यामुळे केजरीवाल यांचे घरातच विलगीकरण केले. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली होती. केजरीवाल यांनी स्वत:ला क्वारंटीन केले असल्याने त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, नुकताच त्यांचा कोरोनाचा अहवाल आला असून त्यांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केजरीवाल यांना ताप आणि खोकला असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. हे देखील वाचा- Coronavirus in India: भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ, 9987 नव्या रुग्णांसह कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 2,66,598 वर

एएनआयचे ट्वीट-

राजधानीतील खाजगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी केजरीवाल यांनी राज्य सरकार आणि काही खासगी मालकीची रुग्णालये केवळ दिल्लीतील नागरिकांच्या उपचारासाठी उपलब्ध राहतील, अशी घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील खासगी रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेवरून वाद निर्माण झाला होता. मात्र नायब राज्यपालांनी हा निर्णय रद्द केला होता.

दरम्यान, भारत करोनारुग्णांच्या बाबतीत जगातील अव्वल दहा देशांमध्ये पोहोचला आणि आता अवघ्या तेरा दिवसांत भारत जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सुदैवाने भारतात रुग्णांच्या आकड्याच्या तुलनेत मृत्यूदर खूप कमी आहे. जगातील अत्यल्प मृत्यूदर असलेल्या देशांमध्ये सध्या भारताचा समावेश होत आहे, हीच भारतासाठी जमेची बाब ठरली आहे. जगभरात करोनामुळे आत्तापर्यंत चार लाखांहून अधिक रुग्ण मृत्यमुखी पडले असताना भारतात मृतांची संख्या 7 हजाराच्या घरात पोहोचली आहे.