Coronavirus Update (Photo Credit: Twitter)

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: धुमाकूळ घातला असून गेल्या 24 तासांत रुग्णांच्या आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतात (India) 9987 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,66,598 वर पोहोचली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 331 नवे रुग्ण दगावले असून देशात मृतांची एकूण संख्या 7466 वर पोहोचली आहे. सद्य घडीला देशात एकूण 1,29,917 रुग्णांवर उपचार सुरु असून 1,29,215 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry of India) सांगण्यात आहे. ही आकडेवारी पाहता लोकांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे असेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण हे महाराष्ट्रात असून राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 2,553 रुग्णांची भर पडली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 88,528 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू, गुजरात, दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

हेदेखील वाचा- देशभरातील धार्मिक स्थळे आजपासून खुली, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करत मंदिर, मशीद, चर्च आणि गुरुद्वारा येथे नागरिकांनी केली प्रार्थना- पहा फोटो आणि व्हिडिओ

दरम्यान, एपिडेमिओलॉजी इंटरनॅशनल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात कोरोना व्हायरस हा सप्टेंबर पर्यंत भारतातून नष्ट होईल असा दावा करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयांतर्गत (Health Ministry), आरोग्य सेवा महासंचालनालयात उप-महासंचालक (सार्वजनिक आरोग्य) डॉ. अनिल कुमार (Dr Anil Kumar) आणि उप सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) रुपाली रॉय यांनी याबाबत सर्वेक्षण केले आहे. या दोघांनीही बेली मॉडेलच्या (Bailey’s Model) आधारे हा दावा केला आहे.