AAP Leaders Meet Uddhav Thackeray | (Photo Credits: ANI)

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी (Aam Aadmi Party) पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल (Punjab CM Bhagwant Mann and other AAP leaders) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईतील निवासस्थानी आज (बुधवार, 24 मे) भेट घेतली. या भेटीवेळी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि Shiv Sena (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut), सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. हे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आम आदमी पक्षाचे (AAP) दोन्ही नेते मंगळवारी संध्याकाळीच मुंबई येथे दाखल झाले होते.

उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी देश आणि राज्याच्या पातळीवरील विद्यमान घडणाऱ्या राजकीय घटना आणि राजकीय घडामोडींवर चर्चा केली. दरम्यान, चर्चेनंत केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतान सांग्तले की, दिल्लीतील नोकरशहांच्या नियुक्त्या आणि बदल्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या केंद्रीय अध्यादेशाविरुद्धच्या लढ्यात त्यांचा पक्ष त्यांना पाठिंबा देईल, असे आश्वासन बॅनर्जी यांनी केजरीवाल यांना दिले. (हेही वाचा, Delhi vs Centre Ordinance Row: अरविंद केजरीवाल आज Uddhav Thackeray उद्या Sharad Pawar यांच्या भेटीला!)

दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते मुंबई येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याचे समजते. या भेटेसाठी केजरीवाल, मान आणि अन्य आप नेते बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. तर शरद पवार यांना भेटण्यासाठी ते राज्याच्या प्रशासकीय मुख्यालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 3 वाजता पवार यांची भेट घेणार आहेत.

ट्विट

आदल्या दिवशी, केजरीवाल आणि मान यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे भेट घेतली त्यांच्या देशव्यापी दौऱ्याचा एक भाग म्हणून दिल्लीतील सेवा नियंत्रणावरील केंद्राच्या अध्यादेशाविरुद्ध AAP च्या लढ्याला पाठिंबा मिळवण्यासाठी या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.