दिल्ली मध्ये प्रशासकीय सेवांच्या नियंत्रणावर केंद्राचा अध्यादेश विरूद्ध विरोधी पक्षांना एकत्र जोडण्यासाठी सध्या आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) काम करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप चे प्रमुख याचसाठी सध्या मुंबई मध्ये दाखल झाले आहेत. आज (24 मे) ते 'मातोश्री' वर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत तर उद्या 25 मे दिवशी ते एनसीपी अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला जाणार आहेत.
आप च्या या मुंबई दौर्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगावंत मान, खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढा, मंत्री Atishi सोबत असणार आहेत. काल त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेतली आहे. देशभर प्रमुख विरोधी पक्षांच्या गाठीभेटी घेऊन नोकरदारांच्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबत केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाविरोधात पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आम आदमी पक्षाच्या (आप) राष्ट्रीय संयोजकाने केंद्रावर दिल्लीतील लोकांचे "अधिकार काढून घेण्याचा" आरोप केला आणि म्हटले की अध्यादेश राज्यसभेत मंजूर केला जाऊ नये. काल केजरीवाल यांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी देखील या अध्यादेशाला विरोध केला जावा असं मत मांडलं आहे. नक्की वाचा: Delhi Saket Court Firing: साकेत कोर्टातील गोळीबारावरुन अरविंद केजरीवालांची केंद्र सरकारवर टीका .
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार देखील 2024 च्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विरोधकांना एकत्र आणण्यासाठी काम देशभर गाठीभेटी घेत आहेत. नितिश कुमारांनी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मलिक्कार्जुन खर्गे, राहुल गांधी यांची देखील भेट घेतली आहे.