DFCCIL Exam Date 2021: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, 1075 पदांसाठी होणार परीक्षा
DFCCIL (Pic Credit - Twitter)

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (DFCCIL) ने कनिष्ठ व्यवस्थापक (Junior manager) आणि कार्यकारी (Executive) यासह 1075 पदांसाठी होणाऱ्या भरती परीक्षेच्या (Recruitment exams) तारखा जाहीर केल्या आहेत.  गेल्या मार्चमध्ये महामंडळाने या पदांसाठी अर्ज (Apply) मागवले होते. या पदांसाठी हजारो उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज (Online Apply) केले आहेत. जे या परीक्षेत उत्तीर्ण होतील. त्यांना पुढील प्रक्रियेसाठी बोलावले जाईल. नुकतीच महामंडळाने भरती परीक्षेची नोटीस जारी केली आहे. यानुसार परीक्षा आगामी 27, 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी विविध केंद्रांवर घेतली जाईल. ही परीक्षा संगणक आधारित (CBT) असेल. याशिवाय अधिक माहितीसाठी महामंडळाकडून लवकरच प्रवेशपत्र (Admit Card) दिले जातील. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले आहेत ते महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट https://dfccil.com ला भेट देऊन परीक्षा सूचना डाउनलोड करू शकतात.

 भारत सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या डीएफसीसीआयएलच्या सिव्हिल, इलेक्ट्रिकल, एस अँड टी, ऑपरेशन्स आणि बीडी आणि यांत्रिक विभागांमध्ये एकूण 1074 रिक्त जागा उपलब्ध आहेत. परीक्षेच्या पेपरमध्ये एकूण 120 प्रश्न दिले जातील आणि 2 तास दिले जातील. परीक्षेत बहु-पर्यायी प्रश्न असतात. सीबीटी परीक्षेसाठी प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांचे नकारात्मक गुण निश्चित केले जातात. हेही वाचा Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी Bitcoin, Dogecoin यांची किंमत कशी ठरते? कोणते घटक ठरतात कारणिभूत?

कॉर्पोरेशनच्या अलीकडील नोटीसनुसार, उमेदवारांची अॅडमिट कार्ड लवकरच वेबसाइटवर अपलोड केली जातील. उमेदवार डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर  https://dfccil.com च्या वेबसाइटला भेट देऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. यासाठी त्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि इतर आवश्यक तपशील टाकावा लागेल.

जर तुम्ही अद्याप परीक्षेचा अभ्यासक्रम पाहत असाल तर, भरतीची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी महामंडळाची वेबसाइट पहा. त्यात तुम्हाला भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती मिळेल.जर तुम्ही अद्याप कोरोना लसीकरण केले नसेल, तर परीक्षा देण्यापूर्वी नक्कीच लसीकरण करा. याशिवाय परीक्षा केंद्रावर मास्क घालून जा आणि सामाजिक अंतर काटेकोरपणे पाळा. तुम्हाला प्रवेश पत्रात याविषयी अधिक माहिती मिळेल.