COVID19 Test: देशात सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अग्रस्थानी
Coronavirus (Photo Credits: PTI)

कोरोनाने (Coronavirus) महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. तसेच कोरोना चाचण्यांची संख्या वाढत आहे. देशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 4 कोटी 30 लाखांपेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत. मागील 2 आठवड्यांमध्ये 1 कोटी 22 लाख 514 चाचण्या झाल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत आहेत, त्यामध्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही तीन राज्य अग्रस्थानी आहेत. देशभरात गेल्या 24 तासामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत.

भारतात आज 69 हजार 921 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 37 लाखांच्या जवळपास पोहचला आहे. यापैकी 65 हजार 288 जणांचा मृत्यू झाला आहे. तर,28 लाख 39 हजार 882 जणांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. भारतात सर्वाधिक उद्रेक महाराष्ट्रात दिसून आला आहे. ज्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या अधिक चाचण्या होणे अपेक्षित आहे. हे देखील वाचा- Coronavirus: खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनसाठी वेगळे पैसे घेता येणार नाहीत, खासगी रुग्णालयांच्या दरनियंत्रणाला राज्य सरकारची मुदतवाढ

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. एवढेच नव्हेतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक देशात आर्थिक संकट ओढावले आहे. दरम्यान, अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी अनेक देशांकडून आता जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातच कोरोना महामारी संपली नसून कोणत्याही नियंत्रणाशिवाय निर्बंध उठवणे विध्वंसाला निमंत्रण देण्यासारखेच आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.