Coronavirus: दिल्लीत लॉकडाउनच्या काळात वडील घराबाहेर जात असल्याने मुलाकडून पोलिसात FIR दाखल
Delhi Police (Photo Credits: IANS)

देशावर कोरोना व्हायरसचे महासंकट आल्याने सरकारकडून त्याच्या विरोधात लढण्यासाठी विविध नियमांचे अंमलबजावणी केली जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नाही. तर दिल्लीत कलम 144 सुद्धा लागू करण्यात आले आहे. याच दरम्यान, दिल्लीतील एक प्रकार समोर आला असून एका मुलाने त्याच्या वडीलांच्याच विरोधात एफआयआर पोलिसात दाखल केली आहे. कारण वडील लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

खरंतर दक्षिण पश्चिम दिल्लीत एका मुलाने वडीलच्या विरोधात पोलिसात धाव घेतली आहे. कारण, मुलाचे वडील सकाळी उठून घराबाहेर जात असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच त्यांना समजावून सुद्धा ऐकत नसल्याचे मुलाने म्हटले आहे. ऐवढेच नाही तर वडीलांना कोरोना व्हायरसंबंधित माहिती आणि लॉकडाउनच्या नियमांबाबत सांगून ही ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. यावर पोलिसांनी सुद्धा मुलाच्या वडिलांना लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडू नका असे सांगितले तरीही ते ऐकण्यास तयार नव्हते. शेवटी मुलाने पोलिसात त्यांच्या विरोधात तक्रार दाखळल केली आहे. दरम्यान, देशातील विविध भागातून लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलीस स्थानकात तक्रारी करण्यात आल्या आहेत.(COVID-19: भारतात कोरोनाबाधितांची संख्या 2301 वर पोहोचली; 56 रुग्णांचा मृत्यू तर, 155 जणांना डिस्चार्ज)

तसेच दिल्लीतील द्वारका जिल्ह्यातील काही जणांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला होता. मात्र होम क्वारंटाइन असताना नियमांचे उल्लंघन करणे चुकीचे असून त्यांच्या विरोधात आता पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तसेच भारतीय दंड संहिता आणि महामारी रोग अधिनियम कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.