कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. भारतातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत एकूण 2 हजार 301 रुग्ण (COVID-19 Positive Cases) आढळून आले आहेत. त्यापैंकी कोरोना विषाणूमुळे 56 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 155 कोरोनाबाधीत रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशातील नागरिक घाबरले आहेत. देशात गेल्या 24 तासांत एकूण 235 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात संचारबंदी घोषीत केली आहे.

देशात कोरोनाचे (Coronavirus) थैमान घातले असताना 18 मार्च रोजी दिल्लीतील (Delhi) निजामुद्दीन (Nizamuddin) परिसरातील मशिदीत एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांतील 500 हून अधिक लोक सहभागी झाले होते. त्यापैंकी काहीजण कोरोनाबाधीत असून त्यांच्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. केरळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातच कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. हे देखील वाचा- कर्नाटक येथे तब्बल 1.25 लाखांची अवैध दारु बाळगल्याप्रकणी दोन जणांना अटक

एएनआयचे ट्वीट-

दरम्यान, मोदी म्हणाले की, लॉकडाऊन काळात आपण घरात एकटे आहोत असे समजू नका संपूर्ण देशावासियांचा पाठिंबा तुमच्यासोबत आहे. कारण हा सामूहिक लढा आहे. कोरोनाच्या संकटाचा अंधःकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी एक दिवा लावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना केले. घरातील सर्व दिवे बंद करुन दिवा, मेणबत्ती किंवा मोबाईल फ्लॅश लाईटच्या माध्यमातून कोरोनाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी प्रयत्न करा. आपण एकत्र आहोत ही एकजूट दाखवण्याचा मार्ग सांगितला आहे. तसंच यामुळे कोरोनाच्या संकटामुळे गरिब जनतेच्या मनात जी निराशा निर्माण झाली आहे ती दूर होऊन त्यांचे मनोबल वाढेल असेही मोदी म्हणाले आहेत.