पेट्रोल, डिझेल (Petrol-Desal) आणि एलपीजीच्या (LPG) वाढत्या किमती आणि महागाईविरोधात काँग्रेस (Congress) पक्ष आज म्हणजेच गुरुवारी देशभरात निदर्शने करत आहे. हे प्रदर्शन प्रभावी करण्यासाठी राहुल गांधींसह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनादरम्यान सर्व नेते 'निवडणूक संपली लूट चालु'च्या घोषणा देताना दिसले. पेट्रोल, डिझेल आणि इतर वस्तूंच्या किंमती विनाकारण वाढत आहेत. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, दररोज पेट्रोल-डिझेल व इतर गोष्टींच्या किमती अकारण वाढत आहेत आणि याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत आहे, त्यामुळे आज आम्ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहोत. यूपीए सरकारच्या काळात जे भाव होते ते व्हायला हवेत, अशी काँग्रेसची मागणी आहे.
आमचा निषेध देशभर चालेल आणि दीर्घकाळ चालेल - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 9 वेळा वाढल्या असून त्याचा परिणाम मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांवर होत आहे. सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवणे थांबवावे, अशी आमची मागणी आहे. आमचा निषेध देशभर चालेल आणि दीर्घकाळ चालेल.
Tweet
#WATCH Congress MP Rahul Gandhi along with party leaders holds protest against fuel price hike in Delhi pic.twitter.com/uIXJMoveLj
— ANI (@ANI) March 31, 2022
पेट्रोल, डिझेलचे दर वाढले की सगळेच वाढतात - थरूर
काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की, जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात, तेव्हा प्रत्येक वस्तूच्या किमती वाढतात. जगात कच्च्या तेलाचे दर सर्वात कमी असतानाही हे सरकार पेट्रोल-डिझेलचे दर वाढवत होते. 101 रुपयांचे तेल भरताना 52 रुपये अबकारी कर म्हणून सरकारकडे जात आहेत.
मोदी सरकार सर्वसामान्यांच्या खिशाला लुटत आहे - अधीर रंजन
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, सर्वसामान्यांच्या खिशाला लुटणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करत आहोत. मोदीजींनी 10 दिवसात 9 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून इतिहास घडवला. 137 दिवसांनंतरही भाव अनाठायी वाढत आहेत. सरकारने ही किंमत परत घ्यावी, अशी आमची मागणी आहे.