Photo Credit- X

Indian Army Calling: आंध्र प्रदेशामधील एका खासगी कोचिंग संस्थेच्या संस्थापकाने एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ (Andhra Pradesh Coaching Viral Video)शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामुळे राज्यमंत्री नारा लोकेश यांनी पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. बसवा वेंकट रमणा नावाचा व्यक्ती ‘इंडियन आर्मी कॉलिंग’ या नावे विद्यार्थ्यांची शिकवणी घेतो. त्याने एका विद्यार्थ्याला बेल्टने मारहाण करत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये (Andhra Pradesh Coaching) दिसत आहे. विद्यार्थ्याचा रडण्याचा आवाज व्हिडीओत येत आहे. इतर काही विद्यार्थी जमिनीवर गुडघे टेकलेले दिसतात.

या व्हिडिओवर नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला, विद्यार्थ्याला शिक्षा करणाऱ्या व्यक्तीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. X वरील अशाच एका पोस्टला उत्तर देताना, मानव संसाधन मंत्री नारा लोकेश यांनी लिहिले, "कारण काहीही असो, अशी आक्रमक कृत्ये अनुचित आहे. राज्य आणि श्रीकाकुलम जिल्हा पोलिस संबंधितांवर योग्य ती कारवाई करतील." असे म्हटले.(Mosque Fire In Srinagar's Khanyar: श्रीनगरमधील खन्यार येथे लागलेल्या आगीत एक मशीद आणि 3 निवासी घरे जळून खाक (Watch Video))

व्हायरल व्हिडिओ डिसेंबर 2023 चा असून तो आता समोर आला आहे. जिथे कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण होताना दिसत आहे. “व्हिडिओमध्ये दाखवलेल्या विद्यार्थ्याची ओळख पटली आहे आणि त्याचे स्टेटमेंट घेण्यासाठी पोलिसांचएक टीम पाठवण्यात आली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी म्हटले.