शाळेत अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्याची तक्रार, शिक्षकाला मारहाण
फोटो सौजन्य- Pixabay

दिल्लीमध्ये 8 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या गैरहजेरीबद्दल पालकांना वारंवार तक्रार केल्याच्या रागाने विद्यार्थ्याने चक्क शिक्षकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दिल्लीतील एका शाळेतील विद्यर्थी काही ना काही कारणे सांगून वर्गात नेहमीच गैरहजर राहायचा. या त्याच्या गैरहजेरीची शिक्षकांनी पालक तसेच मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. तर गैरहजेरीच्या कारणावरुन त्याला शाळेत नियमित येण्यास सांगितले. मात्र शिक्षकांनी केलेल्या या तक्रारीचा राग मनात ठेवून या विद्यार्थ्याने शिक्षकांना मारहाण करण्याचे ठरविले. तसेच दररोजच्या वेळेनुसार हा विद्यार्थी शाळेत आला. त्यावेळी या विद्यार्थ्याने तक्रार केलेले शिक्षक शिकवण्यास आले तेव्हा अचानक त्याने बॅगमधील लोखंडी दांडका काढून शिक्षकाला बेदम मारहाण केली आहे.

या घटनेतील पीडित शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. तर पोलिसांनी या आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.