Chief Election Commissioner Sushil Chandra, Election Commissioner Rajeev Kumar (PC - PTI)

देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा (Sushil Chandra) आणि निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय काही उपनिवडणूक आयुक्त कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर निवडणूक आयुक्त संबंधित अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे सतत संपर्क साधत आहेत, जेणेकरून पश्चिम बंगाल निवडणुकीच्या उर्वरित तीन टप्प्यांसाठी मतदान अखंडपणे होऊ शकेल. (वाचा - COVID-19: लहान मुलं आणि तरुणांमध्ये कोरोना संसर्गाचा कहर! त्यांना संसर्गापासून कसं वाचवावं? जाणून घ्या काय म्हणतात डॉक्टर्स)

बंगालमध्ये 22, 26 आणि 29 एप्रिल रोजी तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान 29 मार्च रोजी घेण्यात आले होते. सुशील चंद्रा यांची गेल्या आठवड्यात मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. सुनील अरोरा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सुशील चंद्रा देशाचे नवे सीईसी झाले आहेत. ते 14 मे 2022 पर्यंत या पदावर कायम राहतील.

दरम्यान, देशात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. प्रकाश जावडेकर, यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव, चंद्रशेखर राव यांच्यासह अनेक नामवंत नेते दुसर्‍या लाटेत कोरोना संक्रमित झाले आहेत. गेल्या 24 तासात देशात कोरोनाची सुमारे 2 लाख 60 हजार नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्याच वेळी, 1700 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत.