Image For Representation (Photo Credits: File Image)

नागरिकांचा काळ्या जादूवरचा (Black Magic) विश्वास नष्ट करण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी अनेक अंधश्रद्धा निर्मलून संस्था देशात कार्यरत आहेत. मात्र, तरीही अनेकजण अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. यातच छत्तीसगडच्या (Chhattisgarh) कबीरधाम (Kabeerdham) जिल्ह्यात एका व्यक्तीने काळ्या जादूच्या संशयावरून आपल्या शेजाऱ्याची हत्या (Murder) केली आहे. ही घटना कवेनार गावात रविवारी रात्री घडली आहे. यावेळी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आरोपीने मृताची पत्नी आणि मुलीवरही प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

परदेशी बैगा (वय, 50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. परदेशी बैगा रविवारी घरात बसलेले असताना शेजारी राहणाऱ्या आरोपी मंगल बैगा (वय, 55) याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात परदेशी बैगा गंभीर जखमी झाले. ज्यामुळे काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नव्हेतर, हल्ल्यावेळी परदेशी बैगा यांची पत्नी आणि मुलीने हस्तक्षेप केला. परंतु, आरोपीने त्यांच्यावरही हल्ला केल्याचे सांगितले. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी पंचनामा केला. तसेच हत्या करून फरार झालेल्या मंगळ बैगाला शेतातून अटक केली आहे. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. हे देखील वाचा- Madhya Pradesh: मध्य प्रदेशमध्ये दरवर्षी 'इतक्या' महिलांची होते हत्या, बलात्काराचा आकडा पाहून बसेल धक्का

सूत्रांनी सांगितले की, परदेशी यांनी यापूर्वी बायगाकडून दररोज होणाऱ्या भयंकर परिणामांच्या धमकीबद्दल पोलिसांना तक्रार केली होती. परंतु ठोस पुरावा नसल्याने कोणतीही कारवाई झाली नाही. या दोघांमध्ये जमीनीवरून वाद असल्याचा पोलिसांचा संशय आहे. याप्रकरणी पोलीस कारवाई करीत आहे.