सोनिया गांधी (छायाचित्र सौ. एएनआय)

जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्लामुळे संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे. यातच काँग्रेसच्या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने चिथावणी दिलेल्या काही गुंडांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थांवर हल्ला केला आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. तसेच या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सोनिया गांधी यांनी देशातील युवकांसंदर्भात आपले मत मांडले असून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जेएनयूत झालेल्या हल्ल्याचा देशभरातील बहुतांश राजकीय पक्ष तीव्र निधेष नोंदवत आहेत. यातच सोनिया गांधी यांनी आक्रमक भुमिका घेत केद्र सरकार टीकास्त्र सोडले आहे. प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयात पोलीस किंवा मोदी सरकारने चिथावणी दिलेले गुंड जात आहेत. देशातील युवकांच्या खिशाला परवडेल अशा खर्चात शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांना नोकरी व उत्तम भवितव्य असणे गजरचे आहे. लोकशाहीतील सारे हक्क या युवकांना बजावता आले पाहिजेत. मात्र, मोदी सरकारच्या काळात देशातील युवकांची विलक्षण घुसमट होत आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. तसेच जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्लाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी त्यावेळी केली आहे. हे देखील वाच- JNU मधील हल्ल्याच्या निषेधार्थ चित्रपट सेलिब्रिटींंनी नोंदवला निषेध; रिचा चड्ढा, विशाल भारद्वाज, तापसी पन्नू, दिया मिर्झा, अनुराग कश्यप आदींचा सहभाग (Video)

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थांना एका जमावाने मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 50 लोकांचा घोळका विद्यापीठाच्या परिसरात घुसला आणि विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घोळक्याने वसतिगृहांची तोडफोड देखील केली होती. यावर राजकीय नेते आणि बॉलिवूड कलाकारांनीही निषेध नोंदवला आहे.