रुपया (Photo Credits: PTI)

केंद्रीय मंत्रीमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून 7व्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यास मान्यता दिली आहे. अशी माहिती आज केंद्रीय मंत्रीमंडळाने दिली. केंद्राने डीएमध्ये कर्मचाऱ्यांना 28 टक्के भाडेवाड मिळाली आहे. तसेच मागील जानेवारी महिन्यात आणि जुलैमध्ये डीएची दोन वेळेस वाढ करण्यात आली होती.

गेल्याच वर्षी डीएमध्ये वाढ करण्यास केंद्राने परवानगी दिली होती. 1 जानेवारी 2020 पासून याचे नवे नियम लागू होणार होते. यात जून 2020 मध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली होती. नंतर जानेवारी 2021मध्ये हा महागाई भत्ता पुन्हा 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला. आता सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या एकूण 17 टक्के डीए मिळतो.

जानेवारी आणि जृन 2020 मध्ये झालेली दरवाढ कोरोनाच्या संसंर्गामुळे थांबली आहे. मात्र आता केंद्राने डीएचा संपूर्ण लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांच्या भत्यात 28 टक्के दरवाढ मिळणार आहे. तसेच अजून दरवाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

मात्र आता केंद्र सरकारने डीएमध्ये दरवाढ केली जरी असली तरीदेखील याचा लाभ कर्मचाऱ्यांना कधी मिळेल हे अजून कळू शकले नाही. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी डीए आणि पेन्शनर्ससाठी डीएचे प्रलंबित हफ्ते जुलै महिन्यापासून पुर्वरत होतील. असे मार्चमध्ये तत्कालीन अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीबाबत कर्मचाऱ्यांच्या वतीने केंद्राशी शिवगोपाल मिश्रा हे संवाद साधत होते. त्यांनी याबाबत मीडियाशी बोलताना सांगितले की, सप्टेंबर डीए आणि डीआरचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. पुन्हा यात विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2021 पासून थकबाकी मिळेल. असेही वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाच्या दरवाढीची प्रतिक्षा आता संपलेली आहे. यावरून केंद्र सरकारला त्यांच्या कर्मचाऱ्यांची जाणीव असल्याची बाब लक्षात येते. केंद्राच्या या निर्णयाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता ही दरवाढ कधी मिळेल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.