Accident (PC - File Photo)

Madhya Pradesh Accident:  मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) गुणा- शिवपूर चार लेनमध्ये भरधाव वेगात असलेल्या कारची दुभाजकाला धजकल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात मंगळावारी सकाळी घडून आला. कार दुभाजकाला धडकून हवेत पलटी होऊन रस्त्याच्या कडेला पडली. या दुर्घटनेत चार जणांचा (Death) मृत्यू आणि तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.( हेही वाचा- रेल्वे ट्रॅक ओलांडताना भरधाव ट्रेनची एकाला धडक,)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील गुणा शिवपूर चार लेनमध्ये अनियंत्रित कारची दुभाजकाला धडक लागल्याने अपघात झाला.कारमधील प्रवाशी कामानिमित्त गुनाहून ग्वाल्हेरला जात होते दरम्यान बदरवासजवळ हा अपघात झाला.या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आणि कारचा चक्काचूर झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाला.

कारमधील लोक काही कामानिमित्त गुना येथून ग्वाल्हेरच्या दिशेने जात होते. पोलिसांनी मृत व जखमींच्या कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली असून पुढील कारवाई सुरू केली आहे. शिवाजी यादव, अशोकनगर येथील रहिवासी प्रदीप पैहार यांचा जागीच मृत्यू झाला तर गोलू परिहार याचा मृतदेह थेट झुडपात आढळून आला. कल्याण केवट, केशपाल परिहार आणि जसवंत यांच्यासह चार जणांना तातडीने गुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला शिवपुरी येथील रुग्णालयात करण्यात आले होते परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.