मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) कंपनीची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली आहे. या सभेमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओ (Jio) प्लॅटफॉर्म्समध्ये आघाडीची टेक कंपनी गुगल (Google) मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच गुगुल आता जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये तब्बल 33 हजार 737 कोटी रुपये गुंतवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यानंतर गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “भारतात प्रत्येकापर्यंत इंटरनेट पोहोचायला हवे. जिओसोबत भागीदारी केल्यामुळे जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचता येईल याचा अभिमान वाटतोय" असे पिचाई म्हणाले आहेत.
गुगलसोबतच्या भागीदारीद्वारे भारताला 2G मुक्त करु. या गुंतवणूकीद्वारे गुगल कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 7.7 टक्क्यांची हिस्सेदारी घेईल. या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये लॉकडाउनदरम्यान गेल्या 3 महिन्यांत झालेल्या एकूण गुंतवणूकीचा आकडा 1 लाख 52 हजार 056 कोटी रुपये होईल, असे अनिल अंबानी म्हणाले आहेत. याशिवाय, भारतीय तंत्रज्ञान असलेले 5G नेटवर्क पुढील वर्षात भारतात लॉन्च करणार असल्याचेही मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले आहे. 5G चे परवाने देण्यास सुरूवात झाल्यानंतर पुढील वर्षी भारतामध्ये हे तंत्रज्ञान लॉन्च करण्यास जिओ सज्ज असेल. एवढेच नव्हेतर, तंत्रज्ञान आपण जगामध्ये निर्यात करण्याक्षम असल्याचेही अनिल अंबानी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- RIL AGM 2020: जिओ प्लॅटफॉर्म मध्ये आता Google ची देखील गुंतवणूक; 5G solution, JioGlass सह या मोठ्या घोषणा
सुंदर पिचई यांचे ट्विट-
Everyone should have access to the internet. Proud to partner with @reliancejio to increase access for the hundreds of millions in India who don’t own a smartphone with our 1st investment of $4.5B from the #GoogleForIndia Digitization Fund.https://t.co/1fP8iBZQfm
— Sundar Pichai (@sundarpichai) July 15, 2020
सुंदर पिचाई यांनी काही दिवसांपूर्वीच स गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे पिचई यांनी स्पष्ट केले आहे. तसेच भारतामधील सोयी सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी डिजीटलायझेशन फंडची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून येत्या 5-7 वर्षांमध्ये भारतात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. आम्ही इक्विटीच्या माध्यमातून, भागीदारीमधून तसेच ऑप्रेशनल क्षेत्रामधून गुंतवणूक करणार आहोत. याच प्रमाणे डिजीटलायझेशनसंदर्भातील बांधकाम आणि इकोसिस्टीम (व्यवस्था) निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करण्यात येईल. आम्हाला भारताच्या भविष्यावर आणि त्याच्या डिजीटल अर्थव्यवस्थेवर विश्वास आहे, हेच या गुंतवणूकीमधून दिसून येत आहे, असे पिचाई यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.