Uttar Pradesh Suicide Case: मेरठमध्ये कौटूंबिक भांडणानंतर व्यावसायिकाने लावला गळफास, पत्नीचाही आत्महत्येचा प्रयत्न
Representational Image (Photo Credits: Pixabay)

मेरठमधील (Meerut) एका व्यावसायिकाने (businessman) पत्नीशी वाद झाल्यानंतर गळफास लावून आपले जीवन संपवले. मंगळवारी नातेवाईकांना 31 वर्षीय अमित बन्सल (Amit Bansal) यांना नौचंडी पोलीस स्टेशन (Nauchandi Police Station) परिसरातील शास्त्री नगर (Shastri Nagar) येथील त्यांच्या राहत्या घरी पंख्याला लटकलेले आढळले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना (Police) कळवले. मात्र 29 वर्षीय पत्नी पिंकीने पतीला लटकलेले पाहून मान आणि मनगट कापण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी सांगितले की ते नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे पीडित आणि त्याच्या पत्नीने हे पाऊल उचलले आहे.

अमित बन्सल एक अभियंता उद्योगपती होता. बन्सलचा व्यवसाय होता. 2016 मध्ये त्याने पिंकी या फॅशन डिझायनरशी लग्न केले आणि या जोडप्याला 7 महिन्यांची मुलगी आहे. पोलिसांनी सांगितले की या जोडप्याने वरवर पाहता आनंदाने लग्न केले होते.  दरम्यान पिंकीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा  Karnataka Murder Case: कामगाराला गोळी मारण्याचा प्रयत्न फसला, स्वत:च्या मुलाच्या डोक्यात घुसली गोळी

शहराचे पोलीस अधीक्षक विनीत भटनागर म्हणाले, कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, अमित आनंदाने विवाहित होता. तसेच तो कोणत्याही आर्थिक अडचणीत नव्हता. आम्ही नेमके काय झाले हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. पिंकी बोलल्यानंतर कारण काय होते ते स्पष्ट होईल. ते म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेजवरून हे स्पष्ट झाले आहे की अमित खोलीत गेला, कापड कापला, दोरी बनवली आणि स्वतःला फाशी दिली.  घटनेमागील स्पष्ट चित्र मिळवण्यासाठी आम्ही त्याचा फोन आणि इतर पुरावे स्कॅन करत आहोत.