BSF Jawan Fired His Companion: अवाजवी ड्युटीमुळे त्रस्त बीएसएफ जवानाने मेसमध्ये आपल्या साथीदारांवर केला गोळीबार; 5 जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी
Firing | (Photo Credits: Pixabay)

BSF Jawan Fired His Companion: अमृतसरमधील (Amritsar) बीएसएफच्या मेसमध्ये (BSF Mess) एका जवानाने गोळीबार केला. या घटनेत गोळीबार करणाऱ्या कॉन्स्टेबलसह सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 5 जवानांचा मृत्यू झाला आहे. रविवारी 6 मार्च रोजी ही घटना घडली. जखमींपैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या चार बीएसएफ जवानांचे मृतदेह रुग्णालयात पोहोचले आहेत. या घटनेत इतर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

गोळीबार करणाऱ्या जवानाने स्वत:वरही गोळी झाडली होती. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. (वाचा - Mumbai: पैशाच्या व्यवहारावरून वाद; ग्राहकाने चाकूने वार करून केली फळ विक्रेत्याची हत्या)

पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सर्व जखमींना गुरु नानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने गोळी झाडली तो बीएसएफचा जवान आहे. या जवानाला अवाजवी काम देण्यात येत होते. त्यामुळे त्याने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

बीएसएफचे कॉन्स्टेबल सुतप्पा यांनी गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे. जास्त ड्युटीमुळे सुतप्पा खूप अस्वस्थ झाला होता. यावरून त्यांचे एका अधिकाऱ्याशी वादही झाले. रविवारी सकाळी त्याने आपल्या रायफलने गोळीबार सुरू केला. गोळीबारानंतर मेसमध्ये गोंधळ उडाला. यात अनेकजण जण जखमी झाले. यानंतर दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. बाकीच्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

गोळीबारानंतर सुतप्पाने स्वतःवर गोळी झाडली. बीएसएफचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. जखमींच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली आहे. या घटनेबाबत बीएसएफकडून एक प्रेस रिलीजही जारी करण्यात आले आहे, ज्यामध्ये या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरीला देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.