Blast| Image Used For representational Purpose | Pixabay.com

Madhya Pradesh Blast: मध्य प्रदेशातील जबलपूर येथील सुभाषचंद्र बोस मेडिकल हॉस्पिटलच्या गेटबाहेर शनिवारी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहे. दहशत पसरवण्यासाठी रवी बिर्याणीच्या दुकानाजवळ हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट केल्याची घटना घडली.या बॉम्बस्फोटात दुकानात उपस्थित असलेले तीन जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.( हेही वाचा-  मुंबई मध्ये पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचे ट्वीट; )

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल काला, भूपेंद्र आणि इतर चार संशयितांनी हल्ला घडवून आणल्याचा आरोप आहे. जबलपूर येथील सुभाषचंद्र बोस मेडिकल हॉस्पिटलच्या गेट बाहेर बॉम्ब स्फोट झाला. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाल्याची माध्यमांना माहिती मिळाली. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस अधिकारी  आणि गाडा पोलिस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

गाडा पोलिस ठाण्यात या घटनेची बॉम्बस्फोट झाल्याची नोंद घेतली आहे. संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले आहे. आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली.  पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.त्यानंतर घटनास्थळावरून फरार झालेले दोन आरोपींना पोलिसांना ताब्यात देण्यात आले. तरुण राईकवार, हेमंत सोनी आणि योगेश बर्मन, अंकित बैन असे संशयित आरोपीचे नाव आहे. हे सर्व जण रामपूरचे रहिवासी आहेत.