Indian Student Found Dead In Ohio: ओहायोमध्ये आढळला भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह,चौकशी सुरु; आठवड्याभरातून तिसरी घटना
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

US News: गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेत दोन भारतीय विद्यार्थांचे मृतेदह आढळून आल्याने खळबळ माजली होती. ही घटना ताजी असताना, पुन्हा एका भारतीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. अमेरिकेतील श्रेयस रेड्डी नावाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. ओहायो येथे तो मृतावस्थेत आढळून आला आहे. आठवडाभरातून ही तिसरी घटना आहे.याच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. (हेही वाचा- बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह लंडन येथील नदीत आढळला)

 

भारतीय वाणिज्य दुतावासाने एक पोस्ट लिहली आहे, ओहोयोमध्ये सापडलेल्या भारतीय वंशाचे श्रेयस रेड्डी  या विद्यार्थ्याच्या दुदैवी निधनामुळे खूप दु:ख झाले आहे. पोलिस तपास सुरु आहे. वाणिज्य दूतावास कुटुंबाच्या संपर्कात राहणे सुरूच ठेवत आहे. त्यांना शक्य ती सर्व मदत केली जाईल, असं या पोस्टात लिहले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, श्रेयस रेड्डी लिंडर स्कूल ऑफ बिझनेसचा विद्यार्थी होता. या घटनेनंतर न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने घटनेबद्दल  दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेनंतर पोलिस चौकशी करत आहे.  विवेक सोनी आणि नील आचार्य असं या दोन तरुणांचा देखील मृतदेह आढळून आला होता.