Firecracker Factory Explosions in MP (PC - Twitter)

Firecracker Factory Explosions in MP: मध्य प्रदेशातील मुरैना (Morena) जिल्ह्यातील बामोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेतपुरा गावात एका दुमजली इमारतीमध्ये असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात (Firecracker Factory) लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एक महिला, एक बालक आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बामोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेतपुरा गावात एका दुमजली घरात हा फटाका कारखाना बेकायदेशीरपणे सुरू होता. अचानक झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण घर कोसळले. यात चार जणांचा मृत्यू झाला असून अर्धा डझनहून अधिक लोक गंभीर जखमी आहेत, जे अजूनही ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. ढिगाऱ्यातून वाचवण्यात आलेल्या चार जणांना गंभीर अवस्थेत ग्वाल्हेरला रेफर करण्यात आले आहे. (हेही वाचा -Earthquake: गुजरात राज्यातील 10.26 वाजता सुरत येथे 3.5 तीव्रतेचा भूकंप)

घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी जेसीबीद्वारे डेब्रिज हटवण्यात येत आहे. या ढिगाऱ्यात अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच एसपी आशुतोष बागरी आणि एसडीओपी आणि टीआय वीरेंद्र कुशवाह यांनी घटनास्थळी धाव घेतली.