महाराष्ट्र, झारखंडमध्ये सरकार गमावल्यानंतर दिल्ली निवडणुकीपूर्वीच भाजप तयारीत
BJP | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

महाराष्ट्र (Maharashtra Assembly Election) आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत (Jharkhand Assembly Election) सत्ता गमवल्यानंतर दिल्ली निवडणुकीपूर्वीच भाजप तयारीला लागली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक (Delhi Assembly Election 2019) पुढच्या वर्षी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने विजय मिळवण्यासाठी आपली रणनिती आखायला सुरुवात केली आहे. यासाठी भाजपने एकून 32 समितीची निवड केली आहे. या समिती जाहीरनामा, निवडणुकीचा प्रचार आणि सभेसाठी काम करणार आहेत. तसेच भाजपने अगामी निवडणुकीच्या संबंधित बैठकांना देखील सुरुवात केली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि हरदिप पुरी यांच्याकडे अगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

भाजपकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीशी संबंधित दररोज बैठका घेतल्या जात आहे. गेल्या 3 दिवसांपासून एका दिवसाला 10 ते 12 बैठकी घेतल्या जात असल्याची माहिती समोर आली होती. दिल्ली येथील भाजप प्रवक्ता हरिश खुराना दिलेल्या माहिती नुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नियमितपणे या बैठकी घेतल्या जात आहेत. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने वेगवेगळे गट तयार केले आहे. यात मीडिया, निवडणूक कार्यालय, प्रचार, इलेक्शन कमिशन, मेनिफेस्टो समिती, अशा कार्यकर्त्यांची बैठक घेतली जात आहे. भाजपला गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ 3 जागांवर विजय मिळवता आला होता. हे देखील वाचा- CAA Stir: 15 डिसेंबरच्या हिंसाचाराबाबत UP पोलिसांची मोठी कारवाई; AMU च्या 1,000 अज्ञात विद्यार्थ्यांविरूद्ध गुन्हा दाखल

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याकरिता भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तसेच येत्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला आकडेवारीत बदल करता येईल, अशी पक्षाची अपेक्षा आहे. भाजप गेल्या 21 वर्षांपासून दिल्लीत सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरले आहे. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र आणि झारखंड येथे मिळालेल्या पराभवानंतर भाजपकडून दिल्लीत विजय मिळवा यासाठी मोठा प्रयत्न करत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला 70 पैंकी 67 जागेवर विजय मिळवला होता.