BJP Manifesto For Arunachal Pradesh: शेतकऱ्यांना 9 हजारांची आर्थिक मदत, एलपीजी सिलेंडर 400 रुपयात; अरुणाचल प्रदेश निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा
Photo Credit - X

BJP Manifesto For Arunachal Pradesh: भाजपने बुधवारी अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2024 साठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda)यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमाला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडूही उपस्थित होते. जाहीरनाम्यात महिल सबलीकरानाकडे ही विशेष लक्ष देण्यात आले आहे. महिलांसाठी 25,000 नोकऱ्या उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्याशिवाय, 400 रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.(हेही वाचा : Six Disqualified Congress MLAs Join BJP: हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या 6 अपात्र आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा काल म्हणजेच बुधवारपासून अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि अंदमान निकोबारच्या दोन दिवसीय निवडणूक दौऱ्यावर आहेत. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर, जेपी नड्डा आज गुरुवारी सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत.

जाहीरनामा प्रसिद्ध करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, राज्यात त्यांचे सरकार स्थापन झाल्यास पक्ष विकास, परिवर्तन आणि समरसतेचे प्रतीक असलेल्या डीटीएच मॉडेलवर काम करेल. राज्यभरात रस्ते, रेल्वे आणि हवाई पायाभूत सुविधांना प्रोत्साहन दिले जाईल. राज्यातील विद्यमान शाळा आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचा कॉर्पस फंड स्थापन केला जाईल. नड्डा म्हणाले की, राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचा आणखी एक निधी उभारला जाईल. किसान सन्मान निधी अंतर्गत, शेतकऱ्यांना सध्याच्या 6,000 रुपयांऐवजी 9,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.