Six Disqualified Congress MLAs Join BJP (PC -X/ANI)

Six Disqualified Congress MLAs Join BJP: काँग्रेसचे अपात्र ठरलेले सहा बंडखोर आमदार (Six Disqualified Congress MLAs) राजेंद्र राणा (Rajendra Rana), सुधीर शर्मा (Sudhir Sharma), रवी ठाकूर (Ravi Thakur), इंद्रदत्त लखनपाल (Indradutt Lakhanpal), देवेंद्र भुट्टो (Devendra Bhutto) आणि चैतन्य शर्मा (Chaitanya Sharma) यांनी भाजप (BJP) मध्ये प्रवेश केला आहे. यासोबतच तीन अपक्ष आशिष शर्मा, केएल ठाकूर आणि होशियार सिंह यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर, भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव बिंदल यांच्या उपस्थितीत सर्व बंडखोरांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी राज्यसभा खासदार हर्ष महाजन हेही उपस्थित होते. गुरुवारी रात्री भाजप हायकमांडसोबत झालेल्या बैठकीत या अपात्र आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं. या बैठकीला राज्यसभा खासदार हर्ष महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदल उपस्थित होते. सुप्रीम कोर्टातील अपात्र आमदारांची याचिका मागे घेणे, भाजपमध्ये प्रवेश करणे आणि भविष्यातील राजकारण याबाबत बैठकीत सखोल चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा -Subramanian Swamy On PM Modi: 'नरेंद्र मोदी हे काम चलाऊ पंतप्रधान आहेत'; भूतान दौऱ्यावरून सुब्रमण्यम स्वामी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका)

भाजप लवकरच कांगडा आणि मंडी लोकसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवार आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सहा उमेदवार जाहीर करू शकते. याबाबत बोलताना राजेंद्र राणा यांनी सांगितलं की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सर्व काही ठरले आहे.

काँग्रेस पक्षाकडे व्हिजन नाही - सुधीर शर्मा

सुधीर शर्मा यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाकडे राज्यात दूरदृष्टी नाही. काँग्रेस केवळ पंतप्रधान मोदींवर टीका करते. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू शकत नसताना आमदार होण्यात काय अर्थ आहे. त्यामुळेच राज्यसभा निवडणुकीत आम्ही आमच्या राज्यातील हर्ष महाजन यांना मतदान केले. आज आपण सर्वजण आपल्या इच्छेने भाजपमध्ये आलो आहोत. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला जातो आणि तुमचे ऐकणारे कोणी नसते तेव्हा तुम्ही अशा ठिकाणी राहू नये.

मुख्यमंत्री हुकूमशहा झाले आहेत - राजेंद्र राणा

यावेळी राजेंद्र राणा म्हणाले, राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यापासून त्यांचे ऐकले जात नाही. तरुणांना रोजगार देण्यासह अन्य बाबींची सरकारने दखल घेतली नाही. काँग्रेस सरकार राज्यातील जनतेला हमीभाव देत नाही. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत, पण लोकांनी आम्हाला विचारले असता आमच्याकडे उत्तर नव्हते. मुख्यमंत्री हुकूमशहा बनून जनतेचा अपमान करत आहेत. आमदारांचे ऐकणारे कोणी नाही. सरकार आमदारांच्या म्हणण्यानुसार चालवले जात नसून सुखविंद्र सखू आणि त्यांचे सहकारी