Subramanian Swamy, PM Modi (PC - ANI)

Subramanian Swamy On PM Modi: भाजप नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली आहे. 'नरेंद्र मोदी हे काम चलाऊ पंतप्रधान आहेत,' असं सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी यांच्या भूतान दौऱ्यावर निशाणा साधताना म्हटलं आहे. मोदी 22 मार्चपासून भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. प्रदेशातील खराब हवामानामुळे हा दौरा पुन्हा नियोजित करण्यात आला.

दरम्यान, स्वामी यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'सार्वत्रिक निवडणुकांची औपचारिकता ठरलेली असताना पंतप्रधानांना परदेशात जावेसे वाटणे हा मूर्खपणा आहे. मोदी पंतप्रधान नसून तदर्थ पंतप्रधान आहेत. अशा काम चलावू पंतप्रधानांनी परदेशात जाऊन भारताचे प्रतिनिधित्व करू नये.' (हेही वाचा -PM Modi condemns Moscow Attack: मॉस्को वरील दहशतवादी हल्ल्याचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निषेध!)

तथापी, मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो प्रदान करण्यात आला आहे. ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो सादर केल्याबद्दल भूतानच्या राजाचे आभारी असल्याचे मोदींनी म्हटले आहे. 'पुरस्कार सादर केल्याबद्दल मी भूतानचे राजे एचएम यांचा आभारी आहे. मी पुरस्कार भारताच्या 140 कोटी जनतेला समर्पित करतो. मला विश्वास आहे की भारत-भूतान संबंध वाढतच जातील. याचा आमच्या नागरिकांना फायदा होईल.'

स्वामींच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, वापरकर्ता डॉ मदन मोहन म्हणाले की, निवडणुकीच्या घोषणेपूर्वी या भेटीचे नियोजन केले गेले असावे. आणखी एका युजरने लिहिलं आहे की, 'ही भेट या प्रदेशातील चिनी योजना उधळून लावण्यासाठी असेल. चीनच्या काही नियोजित हंकी-पंकी उधळण्याशी संबंधित काहीतरी असावे. राजकीयदृष्ट्या, मोदीजींनी निवडणुकीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे अर्थपूर्ण आहे, परंतु तरीही ते प्रवास करत आहेत, क्योंकी व्यक्ती से बडी पार्टी, और पार्टी से बडा? देश. !कार्तव्य सर्वप्रथम.'