भाजप नेत्या उमा भारती यांचे वादग्रस्त ट्विट;  छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना
Uma Bharti (Photo Credit: FaceBook)

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (BJP) पराभवाचा धक्का स्वीकारावा लागला आहे. यातच भाजप नेत्या उमा भारती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj) तुलना केल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण देशात मोदीसारखा कोणताही नेता नाही, सर्व जनतेला मोदी हवे आहेत असे ट्वीट केले आहे. याशिवाय छत्रपती मोदी जिंदाबाद अशीही घोषणाही दिली आहे. यामुळे नव्या वादाला शिंग फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधीही भाजपच्या नेत्यांनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तक प्रदर्शित केल्या मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी अनेक जिल्ह्यातून या पुस्तकाच्या विरोधात अंदोलन करण्यात आली होती

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभा भारती यांनी ट्विट केले आहे. राज्याभिषेकानंतर रयतेने शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी दिली होती. यातच भाजप नेत्या उभा भारती यांनी छत्रपती मोदी असा उल्लेख केल्याने महाराष्ट्रात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उभा भारती यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, जवळपास दीड वर्षांपासून देशातील विविध राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका, त्यानंतर लोकसभेचा निकाल, अलिकडेच काही राज्याच्या निवडणुकीचे निकाल लागले. त्यातून एवढेच स्पष्ट होते की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा सक्षम नेताच नाही. संपूर्ण देशाने मोदींना आत्मसात केले आहे, असे उभा भारती ट्वीटरच्या माध्यमातून म्हणाल्या आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांना छत्रपती अशी उपमा देत त्यांचे कौतूकही केले आहे. हे देखील वाचा- 'दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपला नाकारले' दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

उमा भारती यांचे ट्वीट-

 

 

सर्वत्र दिल्ली विधानसभा निवडणुकीची चर्ची सुरू होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी एकूण 672 उमेदवार मैदानात उतरले आहेत. ज्यात 593 पुरूष तर, 79 महिलांचा समावेश आहे. या निवडणुकीत एकूण 62.49 टक्के मतदान झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 5 टक्के कमी मतदान झाले आहे. दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला 36 जागेवर विजय मिळवून बहुमतांचा आकडा गाठवा लागेल. मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैंकी 67 जागेवर विजय मिळवला होता.