'दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपला नाकारले' दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांची प्रतिक्रिया
Nawab Malik And Narendra Modi (Photo Credit: Facebook)

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Assembly Election Results 2020) निकाल आज जाहीर होत असून या निवडणुकतही अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची जादू दिसत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशद्रोह्यांना मतदान करु नका, असे आवाहन केले होते. नरेंद्र मोदीच्या या विधानावर नवाब मलिक यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. तसेच दिल्लीच्या जनतेने मोदींचे म्हणणे ऐकले असून भाजपला देशद्रोही घोषित करून टाकले आहे, नवाब मलिक म्हणाले आहेत. नवाब मलिक यांच्या वक्तव्यावर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे प्राथमिक कल पाहता मतदारांनी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या बाजुने कौल दिल्याचे समोर आले आहे. यात 'आप'ला 58 तर भाजपला 12 जागांवर आघाडी मिळाली असल्याचे चित्र आहे. आम आदमी पक्षाने बहुमत गाठल्याने दिल्लीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपच्या कार्यलयाबाहेर जल्लोष केला. तसेच या निवडणुकीतही भाजपच्या हाती अपयश आल्याने विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधला जात आहे. तत्पूर्वी मतदानांतर विविध माध्यमांच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी (AAP) पक्षाचेच सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. तर, भाजपाला (BJP) 5 ते 19 जागा मिळतील अशी शक्यता दर्शवली होती. याचबरोबर मागील वेळी एकही जागा न मिळालेल्या काँग्रेसला यावेळी किमान 4 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, अद्याप काँग्रेसला एकही जागा मिळाली नसल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप पराभवाकडे वाटचाल करण्याची 5 महत्त्वाची कारणं

नवाब मलिक यांचे ट्वीट-

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी आम आदमी पार्टीला म्हणजेच आपला 5 ते 63 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक ही भाजपा आणि आप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला 36 जागेवर विजय मिळवून बहुमतांचा आकडा गाठवा लागेल. मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैंकी 67 जागेवर विजय मिळवला होता.