हिसार: भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच्याकडून बाजार समितीच्या अधिकाऱ्याला चपलेने मारहाण; पाहा व्हिडिओ
Sonali Phogat (Photo Credit: Twitter/ Facebook)

भाजपा नेत्या सोनाली फोगाट (BJP leader Sonali Phogat) यांच्याकडून बाजार समितीच्या अधिकाऱ्याला चपलेने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना हरियाणा (Haryana) राज्यातील हिसारमधील (Hisar) बालासमंद येथे घडली आहे. याप्रकरणी बाजार समितीचे सदस्य व व्यापाऱ्यांनी काही दिवसांपासून सोनाली फोगाट यांच्या अटकेची मागणी लावून धरली होती. सोनाली फोगाट यांना अखेर बुधवारी पोलिसांनी अटक केली. त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी हिसार न्यायालयासमोर हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली आहे. मात्र, पीडितला मारहाण करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे हरियाणातील नागरिकामध्ये नाराजी पसरली आहे.

टिकटॉक स्टार व सध्या भाजपाच्या पदाधिकारी असलेल्या सोनाली फोगाट यांनी 5 जून रोजी हिसार जिल्ह्यातील बालसमंद येथे बाजार समितीचे सचिव सुलतान सिंह यांना मारहाण केली होती. संबंधित व्यक्तीने माझ्याविषयी बोलताना खूप वाईट भाषेत वापर केला, असा आरोपही सोनाली फोगट यांनी केला होता. दरम्यान, सोनाली फोगाट यांनी या अधिकाऱ्याला आधी हाताने व नंतर चपलेने मारहाण केली होती. या मारहाणीचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे देखील वाचा-Fact Check: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची वेतन वाढ पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलली? या व्हायरल वृत्ताबाबत PIB ने केला खुलासा, जाणून घ्या सत्य

ट्वीट-

सोनाली फोगाट या प्रसिद्ध टिकटॉक स्टार आहेत. त्या नेहमी व्हिडीओ टिकटॉकवर पोस्ट करत असतात. नुकताच काही वर्षापूर्वी त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी 2019 मध्ये काँग्रेस नेते कुलदीप बिश्नोई यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत कुलदीप बिश्नोई यांनी सोनाली फोगाट यांना पराभूत केले होते.