दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपचा पराभव; 2 वर्षात गमावली 6 राज्यात सत्ता
बीजेपी (Photo Credits: IANS)

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Assembly election 2020) 11 जानेवारी निकाल लागला असून जनतेने पुन्हा केजरीवार सरकारच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपला (BJP) मोठा धक्का लागला आहे. देशाच्या राजधानीच्या विधानसभेची किल्ली आपल्या हातात घेण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या भाजपच्या हाती केवळ निराशा लागली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 62 तर, भाजपला केवळ 8 जागेवर विजय मिळवता आला आहे. महत्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घसरण सुरु झाल्याचे चिन्ह दिसत असून गेल्या दोन वर्षात भाजपला 6 राज्यात सत्ता गमवावी लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवत केंद्रात सरकार स्थापन केली आहे. परंतु, देशातील विधानसभा निवडणुकीत भाजपला काही राज्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या चार राज्यात भाजपचा पराभव झाला आहे. तर, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये अधिक जागा मिळवून भाजपला सत्ता स्थापन करण्यास अपयश आले आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि आंध्रप्रदेश मध्ये टीडीपीशी युती तुटल्याने भाजपचा सत्तेपासून दूर जावे लागले आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले होते. याचा भाजपला मोठा धक्का लागला आहे. तसेच एकापाठोपाठ अनेक राज्यात सत्ता गमवल्याने भाजपचे टेन्शन वाढवले आहे. हे देखील वाचा-भाजप नेत्या उमा भारती यांचे वादग्रस्त ट्विट; छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना

सर्वत्र दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी बहुमत मिळवल्याची चर्चा सुरू आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकूण 672 उमेदवार मैदानात उतरले आहेत. ज्यात 593 पुरूष तर, 79 महिलांचा समावेश होता. या निवडणुकीत एकूण 62.49 टक्के मतदान झाले होता. महत्वाचे म्हणेजे, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 5 टक्के कमी मतदान झाले आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांची जादू चालली आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैंकी तब्बल 62 जागेवर विजय मिळवला आहे. यासाठी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेचे आभार देखील मानले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही आम आदमी पक्षाने 70 पैंकी 67 जागेवर विजय मिळवला होता.