Maharashtra Political Crisis: भाजप असंतोष सहन करू शकत नाही, त्यामुळे त्याला इतर राजकीय पक्षांची सरकारे पाडायची आहेत, भूपेश बघेल यांचे वक्तव्य
Chhattisgarh CM Bhupesh Baghel.

महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिक गडद होत आहे. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे पक्षात फूट पडताना दिसत आहे, तर महाविकास आघाडी सरकार (MVA Government) ही अडचणीत सापडले आहे.  पक्ष आणि सरकारला एकप्रकारे वाचवण्यात उद्धव ठाकरे व्यस्त असताना तेच एकनाथ शिंदे मात्र आरपारची लढाई करण्याच्या मनस्थितीत आहेत. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी महाराष्ट्रातील राजकीय संकटावर टोला लगावला आहे. बिगर भाजपशासित (BJP) राज्यांमध्ये केंद्रीय संस्थांचा गैरवापर होत आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल म्हणाले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे आणि कोणताही अर्थ नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी महाराष्ट्रातील राजकीय संकटावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. भूपेश बघेल म्हणाले की, केंद्र सरकारला 8 वर्षे झाली, भाजपच्या कोणत्याही नेत्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर सांगा. जे गुन्हे दाखल होत आहेत ते सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांवर होत आहेत.

कुंकरी, छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांनी आरोप केला की, भाजप असंतोष सहन करू शकत नाही. त्याला इतर राजकीय पक्षांची सरकारे कोणत्याही प्रकारे पाडायची आहेत.ती बिगर-भाजप शासित राज्यांमध्ये केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे. त्यांना विरोधकांना चिरडून नष्ट करायचे आहे. याचा फटका भाजपला सहन करावा लागणार आहे, हे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे, समजून घेत आहे, असेही ते म्हणाले. हेही वाचा Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना आव्हान, 'समोर या डोळ्यात डोळे घालून बोला'

महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान, गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे गटाकडून बैठक बोलावण्यात आली असून, त्यात पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात येत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींच्या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे गट कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. उपसभापतींनी बंडखोर आमदारांना नोटिसा बजावल्या.