देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचं सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच बिहारच्या (Bihar) छपरा (Chapra) येथून सर्वांना हादरून टाकणारी बातमी समोर आली आहे. या परिसरात बाजारातून परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) झाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही इयत्ता नववीत शिकत आहे. पीडत मुलगी ही होळीच्या दिवशी गावातील ओढ्याजवळून जात असताना 3 जणांनी तिचा रस्ता अडवला. तसेच तिला जवळच्या गव्हाच्या शेतात घेऊन जाऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरचं थांबले नाहीत, तर त्यांनी पीडितेवर बलात्कार करतानाचा व्हिडीओही काढला. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. पीडितेच्या पालकांनी संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Gangrape: धक्कादायक! 5 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार; हसण्या-खेळण्याच्या वयात 2 अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर, या घटनेतील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली आहे. फरार आरोपींना लवकरच अटक करू असे आश्वासन स्थानिक पोलिसांनी दिले आहे. संबंधित घटना 28 मार्च रोजी दुपारच्या वेळी घडली आहे.