Gangrape: धक्कादायक! 5 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार; हसण्या-खेळण्याच्या वयात 2 अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच बिहारच्या (Bihar) सिवान (Siwan) येथील एका घटनेने सर्वांनाच चिंतेत टाकले आहे.

Gangrape: धक्कादायक! 5 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार; हसण्या-खेळण्याच्या वयात 2 अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल
Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे सत्र थांबायला तयार नाहीत. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच बिहारच्या (Bihar) सिवान (Siwan) येथील एका घटनेने सर्वांच्या चिंतेत आणखी भर टाकली आहे. या परिसरात राहणाऱ्या एका पाच वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणातील एका आरोपीचे वय दहा तर, दुसऱ्या आरोपीचे वय अकरा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकरा वर्षीय आरोपी सिवानचा रहिवाशी आहे. तर, दुसरा दहा वर्षाचा आरोपी मध्य प्रदेशचा रहिवाशी आहे. तो आपल्या मामाकडे राहण्यासाठी सिवानला आला होता. या दोघांनीही याच परिसरात राहणाऱ्या एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती होताच पीडिताच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाणे गाठले. तसेच दोघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर अकरा वर्षाच्या आरोपीला त्याच्या घरच्यांनी दुसऱ्या शहरात शिफ्ट केले. तर, दुसऱ्या दहा वर्षीय आरोपीला त्याच्या नातेवाईकांनी उत्तर प्रदेशातील त्याच्या घरी पाठवले. एवढेच नव्हेतर आरोपींचे सर्व पुरूष नातेवाईकही फरार झाले होते. हे देखील वाचा- तमिळनाडू येथे 3.5 कोटींची इंन्शुरन्सची रक्कम मिळवण्यासाठी बायकोनेच नवऱ्याला जीवंत जाळले

दरम्यान, पोलिसांनी आरोपींच्या महिला नातेवाईकांना कडक शब्दात इशारा दिला. त्यानंतर अकरा वर्षीय आरोपीला त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांसमोर हजर केले. तर, दुसऱ्या आरोपीच्या नातेवाईकांनाही त्याला पोलिसांसमोर हजर करण्यास सांगितले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच हसण्या खेळण्याच्या वयात मुलांकडून होणाऱ्या गंभीर गुन्ह्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2021 05:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).